'या' संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतोय; बालकांचे नियमित लसीकरण करून घ्यावे: मनपा

'या' संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतोय; बालकांचे नियमित लसीकरण करून घ्यावे: मनपा

नाशिक | प्रतिनिधी

गोवर (Measles) संसर्गजन्य आजाराची साथ सध्या मुंबईसह (mumbai) काही ठिकाणी सुरू आहे.

त्यामुळे बालकांचे (children) नियमित लसीकरण (vaccination) करून घ्यावे, असे आवाहन नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने करण्यात आले आहे. नाशिक (nashik) मध्ये परिस्थिती आटोक्यात असून अद्याप रुग्ण (patient) नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

गोवर (Measles) साथीच्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे, ताप (fever), सर्दी (cold), खोकला (Cough) असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावी, दूषित हातांचा स्पर्श तोंड, नाक यांना होणार नाही, याची काळजी घ्यावी, रुग्णाने विश्रांती घेऊन हलका आहार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके (Medical Officer Dr. Ajita Salunke) यांनी सांगितले आहे की, बालकांचे वय ९ महिने पूर्ण झाल्यानंतर पाहिला डोस घेण्यास हरकत नाही. दुसरा डोस १६ ते २४ महिने झाल्यावर घेण्यात यावा. तसेच ज्या बालकांचे लसीकरण (Immunization of children) झाले नसेल तर बालकाचे वय वर्ष ५ पर्यंत असेल तर गोवर रुबेलाचे लसीकरण (Rubella vaccination) करून घेणे आवश्यक आहे.

या आजाराचे निदान झाल्यास त्या मुलांना शाळेत (school) पाठवू नये. आजार वेगाने प्रसार करणारा आहे. वेगळ्या खोलीत ठेवावे. भरपूर विश्रांती घ्यायला लावणे. बहुतांशवेळा मुले लहान असल्याने एकट्याला खोलीत ठेवणे शक्य नसते. प्रौढांना या आजाराचा फारसा धोका नसतो. आजारी मुलांना मात्र इतर मुलांबरोबर मिसळू देऊ नये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com