मनसेनेचा चढता काळ सुरू; माझ्या नाशिक मध्ये फेऱ्या वाढणार: अमित ठाकरे

मनसेनेचा चढता काळ सुरू; माझ्या नाशिक मध्ये फेऱ्या वाढणार: अमित ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रत्येक पक्षाचा बॅड पॅच (Bad patch) येत राहतो, आमच्याही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) बॅड पॅच आला होता. त्या काळात आम्ही भरपूर काही शिकलो आहे, मात्र आता पक्षाचा चढता काळ सुरू झाला आहे.

त्यामुळे आगामी नाशिक महापालिकेसह (Nashik Municipal Corporation) सर्व निवडणुकांमध्ये (election) पूर्ण शक्ती निशी उतरण्याची तयारी आहे. आता माझे नाशिक (nashik) मध्ये देखील फेऱ्या वाढणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Maharashtra Navnirman Sena youth leader Amit Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 2012 ते 2017 या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता होती.

त्या काळात नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास (Development) करण्यात आला असा दावा करीत त्यांनी बॉटनिकल गार्डन (Botanical Garden) असो की बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय (Balasaheb Thackeray Arms Museum), तसेच शहरातील रिंग रोडचा विषय असो की गोदा पार्कचा (Goda Park) विषय असो मुंबई नाक्यावर तयार करण्यात आलेल्या ट्राफिक चिल्ड्रन पार्क (Traffic Children's Park) असो की शहराचा पाण्याचा प्रश्न असो अशी अनेक कामे या काळात आम्ही केली.

त्या काळात शासनाने आम्हाला पूर्ण वेळ आयुक्त देखील दिला नव्हता तरीही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विशेष लक्ष देऊन शहराच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने भरपूर कामे केली, मात्र 2017 च्या निवडणुकीत ती कामे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडलो. सध्याच्या काळात विकास कामे (Development works) करताना त्या ठिकाणी आपला फोटो तसेच नावाची पाटी लावण्याची प्रथा सुरू झाली आहे, ती आम्ही केली नाही, असा टोला लगावला. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहे. आता माझे नाशिक मध्ये फेऱ्या वाढणार आहे. असे त्यांनी सांगितले.

फेरबदलाचे संकेत

नाशिक तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला होता. शहरातील चार पैकी तीन आमदार तर तब्बल 40 नगरसेवक होते. मात्र मध्यंतरी काही काळ पक्षाला बॅड पॅच आला होता, तो संपला असून आता नव्याने आम्ही कामाला लागलो आहे. आगामी काळात नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत देखील अमित ठाकरे यांनी दिले. तसेच महिला आघाडीसह विद्यार्थी आघाडीला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने काम होणार असल्याचे सांगितले.

अहवाल राज ठाकरेंकडे जाणार

अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दिवसभर शहरातील विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या. आज त्यांनी नाशिक रोड, पंचवटी, सातपूर तसेच नवीन नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी तसेच भविष्यातील योजनांची माहिती जाणून घेतली. उद्याही ते पक्षाच्या मुख्यालय असलेल्या राजगड या ठिकाणी उर्वरित विभागांच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहे. दोन दिवसांचा अहवाल पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे तर यानंतर लवकरच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com