उद्या इथे पाहता येणार दहावीचा निकाल

उद्या इथे पाहता येणार दहावीचा निकाल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या (SSC board exam) उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल (Online results) जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे..

करोनामुळे (Corona) यंदा प्रथमच दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या करण्यात आले.

यंदा दहावीच्या परिक्षेस १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुले आहेत तर मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. यात आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दहावीचा निकाल लावताना ९ वी व १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय ०८ ऑगस्ट २०१९ नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा १०० गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष २०२०-२१ साठी इ.१० वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचे १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण देण्यात येतील. विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण देण्यात येणार आहेत.

असा पाहा निकाल

निकाल पाहण्यासाठी, www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org किंवा www.maharashtraeduction.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर (Seat Number) स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही (Download) करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही (Printout) काढता येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com