Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागोदामाई पुन्हा खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला लागले पाणी, विसर्ग आणखी वाढवणार

गोदामाई पुन्हा खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला लागले पाणी, विसर्ग आणखी वाढवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून सकाळी ११ वाजता ५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता…

- Advertisement -

पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून सायंकाळी ७ वाजता ७००० क्युसेसपर्यंत वाढवण्यात येणार आहे. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल.

टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ…

नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सध्या होळकर पुलाखालून ६ हजार २९८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाघाटावर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या