राज्य पोलीस दलात लवकरच भरती प्रक्रिया होणार

गृह विभागाची माहिती
राज्य पोलीस दलात लवकरच भरती प्रक्रिया होणार

मुंबई | प्रतिनिधी ( Mumbai )

राज्य पोलीस दलात ( Police Department ) लवकरच दहा हजार पोलिसांची भरती ( Recruitment )होणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी एकाच वेळी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ती पारदर्शी असेल, अशी माहिती गृह विभागाच्या (Home Department )सूत्रांनी गुरुवारी दिली.

पोलीस दलात नुकतीच सात हजार पोलिसांची भरती झाली आहे. त्यानंतर होणारी ही मोठी भरती असून पोलीस दलात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकले नव्हती.

राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता राज्याला मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची आवश्यकता आहे. आता राज्य सरकारने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा केल्याने नजीकच्या काळात पोलीस दलाला अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com