Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या‘आनंदाचा शिधा’ पोहचलाच नाही

‘आनंदाचा शिधा’ पोहचलाच नाही

निफाड। प्रतिनिधी | Nipahd

वाढत्या महागाईने (inflation) गरिबाची दिवाळी (diwali) गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने (state government) 100 रुपयात ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची राज्य सरकारने रुपये खर्चुन मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली.

- Advertisement -

मात्र, आता भाऊबीज संपली असतांनाही शासनाचा हा ‘आनंदाचा शिधा’ निफाड तालुक्यातील (Niphad taluka) पूर्व भागातील अनेक गावांमध्ये अद्याप पोहचलाच नाही. त्यामुळे आता हा शिधा मिळणार कधी अन् त्यांचे मिष्ठान्न पदार्थ बनविणार कधी याचे उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याने शिधापत्रिका (ration card) धारकांनी सरकार विरुद्ध संताप व्यक्त केला

अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच वाढत्या महागाईचे (inflation) सर्वसामान्य जनतेला चटके सहन करावे लागत आहे. साहजिक हे सारे विचारात घेऊन सर्वसामान्य जनतेला दिवाळीत (diwali) फराळाचे साहित्य रास्त दरात स्वस्त धान्य दुकानातून मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ हा महत्वकांक्षी निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

यात सध्याच्या बाजारभावाने 1 किलो (40 रु.), रवा 1 किलो (50 रु.), पामतेल 1 किलो (100 रु.), हरभरा डाळ 1 किलो (80 रु.) आदी साहित्य अवघ्या 100 रुपयात देण्याचे ठरवून त्याची व्यवस्थित पॅकिंग करून ते स्वस्त धान्य दुकानातून (grain stores) देण्याचा निर्णय घेतला. साहजिकच दिवाळीपूर्वी वेगवेगळ्या चॅनलवरून तसेच वृत्तपत्रातून त्याबाबत मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात साहजिकच सर्वसामान्य नागरिक दररोज स्वस्त धान्य दुकानात चकरा मारू लागले. अनेक ठिकाणी ग्राहक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात शाब्दीक चकमकी घडल्या. मात्र आता लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) झाले, भाऊबीज (baubeej) देखील झाली.

एकुणच दिवाळीचा सण (diwali festival) संपला तरी देखील राज्य सरकारचा हा ‘आनंदाचा शिधा’ अनेक गावापर्यंत पोहचलेला नाही. मोठा गाजावाजा करीत शासनाने ही घोषणा असली तरी दिवाळीत सर्वसामान्यांना मात्र या शिधापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे आता हा शिधा मिळणार कधी अन् त्यापासून गोड पदार्थ बनवायचे कधी. त्यातच दिवाळी संपल्याने आता गोड पदार्थ बनविणे देखील शक्य नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा शिधा पोहचलेला नाही. आता दिवाळीनंतर मका, सोयाबीन काढणीसह द्राक्षबागेची कामे, खुडणी, भाजीपाला काढणी आदी कामांना वेग येणार आहे.

साहजिकच दिवाळीनंतर राज्य शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ मिळाला तरी तो बनविण्यास या मजुरांकडे वेळ नाही. अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार म्हणून शेतमजुरांनी दिवाळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानात चकरा मारल्या; परंतू दिवाळी झाली तरी हा शिधा पोहचलेला नाही. त्यामुळे दिवाळीत गरिब कुटुंबांना शिधा घोषणा पूर्णत्वास येवू शकली नाही अन् आता हा शिधा मिळाला तरी त्याचा फारसा उपयोग नाही.

कारण ज्या कारणासाठी हा शिधा देण्याचे जाहिर केले होते तो हेतू शासनाचा सफल होवू शकला नाही. एकूणच पीक नुकसानीचे पंचनामे अन् नुकसान भरपाई सारखीच ‘आनंदाचा शिधा’ या योजनेची परिस्थिती झाल्याचे आता सर्वसामान्य नागरिक बोलतांना आहे. त्यामुळे शासनाने घोषणा करण्यापूर्वी सदर योजनेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

पॅकिंग अभावी शिधा पोहचण्यास उशीर

अवघ्या 100 रुपयात चना दाळ, पामतेल, रवा, साखर हे चार साहित्य प्रत्येकी 1 किलो पॅक मध्ये देण्याची घोषणा शासनाने केली तसेच हे सर्व साहित्य दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात पोहचेल अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती. साहजिकच या आनंदाच्या शिधा बाबत चौकशी केली असता हे सर्व साहित्य तालुक्यातील पिंपळगाव बसवंतच्या गोडावून मध्ये दाखल झाले आहे. मात्र हे साहित्य ज्या पिशवीतून एकत्र द्यावयाचे त्या पिशवीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आले असून या पिशवीत हे सारे साहित्य पॅकिंग करावयाचे असल्याने त्यास उशिर होत आहे.

साहजिकच केवळ आपले फोटो घराघरात पोहचावे या अट्टाहासामुळे दिवाळी संपली तरी हा शिधा सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकला नाही. कारण हा शिधा दिवाळीपूर्वीच तालुक्याच्या गोडावूनमध्ये पोहचला आहे. मात्र, राज्य शासनाकडून फोटो छापून आलेल्या पिशव्यांमध्ये हा शिधा वेळ लागत असल्याने तो वेळेवर पोहचत नसल्याची खंत सर्वसामान्य ग्राहक व्यक्त करीत आहे.

शिधा येण्याची प्रतीक्षा करतो आमचे स्वस्त धान्य दुकान विकास सह. सोसायटी मार्फत चालविले जाते. शासनाने 100 रुपयांमध्ये शिधा देण्याची घोषणा केल्यापासून स्वस्त धान्य दुकानात दररोज ग्राहक चकरा मारत आहेत. मात्र, शिधा अद्यापपर्यंत पोहचू शकलेला नाही. भाऊबिजेला दुपारपर्यंत पोहचणार असल्याचे समजते. साहजिकच शिधा पोहचल्यानंतरच त्याचे मोजमाप घेऊन वितरण करण्यात येईल. शिधा येण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.

– प्रकाश वाघ, वितरक (स्वस्त धान्य दुकान)

- Advertisment -

ताज्या बातम्या