आनंदाचा शिधा आला, तोही अपूर्णच

जिल्हयासाठी रवा अवघा १९८ क्विंटल
आनंदाचा शिधा आला, तोही अपूर्णच

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गुढीपाडवा (gudhipadwa) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना (ration card holders) आनंदाचा शिधा (ration of happiness) देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मात्र, गुढीपाडवा (Gudhipadwa) होउनही शिधापत्रिकाधारकांना शिधा मिळू शकलेला नाही. गुरूवारी (दि.२४) आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. मात्र, शिध्यातील केवळ रवाच प्राप्त झाल्याने शिधापत्रिकाधारकांना अद्याप प्रतिक्षाच करावी लागणार आहे. जिल्हयाला १९८ क्विंटल रवा प्राप्त झाला आहे. राज्यातील सर्वसामान्यांचा पाडवा गोड व्हावा.

यासाठी स्वस्त दरात आनंदाचा शिधा (ration of happiness) देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गरीब कुटुंबांना १०० रूपयांत १ लीटर खाद्यतेल, १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर मिळणार आहे.

आनंदाचा शिधा दिवाळीला घरोघरी पोहोचला होता. त्यामुळे आता गुढपाडव्यासाठीही सर्वसामान्यांचे डोळे त्याकडे लागले. मात्र, गुढीपाडवा उलटून गेला तरी, शिधा जिल्हयातही पोहचलेला नाही. राज्यात केवळ तीनच जिल्हयात शिधा पोहचल्याचे वृत्त आहे.

लाख ८२ हजार ५६२ किट मिळणार

नाशिक जिल्ह्याकरिता ७ लाख ८२ हजार ५६२ किट राज्य सरकार देणार आहे.यायचा अर्थ एवढ्याच कुटुंबांना हे किट मिळणार आहे. मात्र,पाडवा उलटूनही शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळू शकलेला नाही.नाशिक जिल्ह्याकरीता देखील उर्वरित शिधा लवकरात लवकर प्राप्त व्हावा,याकरीता पाठपुरावा सुरू असल्याची माहिती प्रशासनातील अधिकृत सुत्रांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com