Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात ( Nashik District ) आतापर्यंत सरासरी 76 टक्के पाऊस ( Rain )झाला आहे. यंंदा नांदगाव व मालेगाव ( Malegaon & Nandgaon Taluka ) तालुक्याने आघाडी घेेतली असून नांदगाव तालुक्याने 133 तर मालेगावने 114 टक्के पावसाची सरासरी ओलांंडली आहे. बाकी तालुके अद्याप 90 टक्क्यांच्या खालीच आहेत. अजूनही गतवर्षीपेक्षा हा पाऊस 15 टक्के कमीच आहे.

- Advertisement -

आज नांंदूरमध्यमेश्वरमधून 505 क्यूसेक, वालदेवीतून 16, कडवातून 150, हरणबारीतून 251, नागासाक्यातून 636 क्यूसेक पाणी सोडले जात आहेे. गंंगापूर 92 टक्के भरले आहे. पालखेड 89 टक्के, चणकापूर 90 टक्के, दारणा 95 टक्के भरले आहे. नाशिकमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून तुरळक पाऊस पडत होता.

गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक 16, इगतपुरी 29, पेठ 46, नांंदगाव 123, चांदवड 17, त्र्यंबकेश्वर 22, सुरगाणा 69, निफाड 53, बागलाण 46, मालेगाव 33, येवला 51, सिन्नर 54, देवळा 15, कळवण 33.

गतवर्षी याच दिवसापर्यंत 91.90 टक्के पाऊस झाला होता. तो यंदा 76 टक्क्यांवर आला आहे. मालेगाव तालुक्यात 114, इगतपुरी 80, सुरगाणा 83, बागलाण 81, सिन्नर 73, येवला 71, नांंदगाव 133 टक्के पाऊस झाला आहे. नाशिकला 44 व चांदवडला 39 टक्के पाऊस झाला आहे. काल एकाच दिवसात जिल्ह्यात 628 मिलिमीटर पाऊस झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या