Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पावसाचा जोर वाढला; सतर्कतेचा ईशारा

नाशकात पावसाचा जोर वाढला; सतर्कतेचा ईशारा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक ( Nashik )शहर व परिसरात बुधवारी रात्री तीन तासांत मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) झाला तसेच आज संध्याकाळी साडे पाच ते साडे आठच्या तीन तासांत १७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातदेखील तितकाच दमदार पाऊस कोसळला. यामुळे गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग गुरुवारी पहाटेपासूनच सुरू करण्यात आला. दुपारपर्यंत ५ हजार ८८४ क्युसेकपर्यंत विसर्ग तीन टप्प्यांत वाढविला गेला होता. रात्रीपर्यंत हा विसर्ग कायम होता.

- Advertisement -

गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा

धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापुर धरणातून ( Gangapur Dam ) दुपारी १ वाजेपर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने केला गेला. रात्री आठ वाजेपर्यंत ५ हजार ८८८ क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. संध्याकाळी झालेल्या पावसामुळे साडेसात वाजता होळकर पुलाखालून पुढे ७ हजार ८३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाले. नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापुर समुहात झालेला पाऊस (मिमी.मध्ये)

गंगापुर – ८०, त्र्यंबकेश्वर-७१, आंबोली-७६, गौतमी-५३, काश्यपी-७१. याप्रमाणे पाऊस गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोजला गेला. गंगापुर धरणाचा जलसाठा हा ९९ टक्के इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या