पावसाचा जोर कायम

नदीकाठावरील व्यवसाय ठप्पच
पावसाचा जोर कायम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाचा ( Rain ) मुक्काम अद्याप कायम असून धरणातील साठा 73 टक्क्यांंपर्यंंत जाऊन पोचला आहे. या पावसामुळे वाहून गेले पाचही जण अद्याप बेपत्ता असून त्यांचे कुटुंंबीय हवालदिल झाले आहे. पावसामुळेे मुंबई व गुजरातकडे जाणार्‍या वाहतुकीवर मोठा परीणाम झाला असून वाहतूक संथ गतीने सुरु आहे. नदीपात्रातील पाणवेलींमुळे बंंधारे फुटण्याची भिती व्यक्त होत आहे.

गंगापूर, दारणा, नांदुरमध्यमेश्वर धरणातून (Gangapur, Darna, Nandurmadhyameshwar dam)अजुनही पाण्याचा विसर्ग ( Water discharge)सुरुच असल्याने गोदावरी, दारणा नदीचा पूर अद्याप कायम आहे.काल सकाळ पासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. थोडे सूर्यदर्शऩ होते.पुन्हा पाऊस सुरु होतो.त्यातच धरणातून विसर्ग सुरु असल्याने नदीची पातळी कमी होण्याचे नाव घेत नाही. महामार्गावर पाणी साचल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. येथे 24 तास पोलिस तैनात करुनही फारसा फरक पडलेला नाही.

जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या पाचही जणाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुःखात आहे. काल शहरात पावसाच जोर कमी होता. त्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत झाली.मात्र नदीकाठी पुरामुळे अद्याप व्यवसाय ठप्पच आहे. काल सायंकाळी सहा वाजेपर्यंंत गंगापूर धऱण क्षेत्रात काश्यपीत 15, गौतमीजवळ 80, त्रंंबक येथे 51, आळंदी येथे 62, दारणात 19, भावली 10 मिलीमीटर पावसाची नोेंद झाली.दुसरीकडे धरणातून विसर्ग सुरुच आहे. दारणातून 10670,कडवातून 2592, गंगापूरमधून 7128, आळंंदी धरणातून 687 क्युसेक विसर्ग सुरु होता.होळकर पुलाखालून 10854 क्युसेकने पाणी वाहत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com