Wednesday, April 24, 2024
Homeजळगावबीएचआरच्या 141 बँकांतील 150 खात्यांसह 37 मालमत्तांबाबत सरकारी वकिलांनी दिली मोठी माहिती..

बीएचआरच्या 141 बँकांतील 150 खात्यांसह 37 मालमत्तांबाबत सरकारी वकिलांनी दिली मोठी माहिती..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यभरात गाजलेल्या बीएचआर (BHR) पतसंस्थेशी संबंधित दाखल असलेलया 11 गुन्ह्यांमधील प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्याशी संबंधित असलेल्या आर. बी. डायमंड, साची कन्सट्रक्शन यांच्या राज्यभरातील 141 बँकांमधील 150 बँक खाते (bank accounts) गोठविले असून या व्यवहारांशी संबंधित चार जणांच्या एकूण 37 मालमत्ता (properties) देखील जप्त केल्या आहेत. हा निर्णय बुधवारी जिल्हा न्यायालयाला प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील (public prosecutor) अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी दिली.

- Advertisement -

पाच दरोडेखोरांचा हैदोस; तरुण जखमी

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी पतसंस्थेतकडून ज्यादा व्याचे अमिष दाखवून त्यांनी ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्विकारल्या होत्या. परंतु ठेवीची मुदत पुर्ण होवून देखील त्यांनी ठेवीदारांच्या ठेवी लाभासह परत केल्या नसल्याने राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 81 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

यापैकी श्रीगोंदा, तळेगाव, खेड, खडका, डेक्कन, शिलेगाव, साकारवाडी, पिंप्री, अकलूज, इंदापूर आणि पाचोरा या 11 ठिकाणी गुन्ह्यांमध्ये दि. 8 जानेवारी रोजी राजपत्र प्रसिद्ध केले. तसेच बँकेशी संबंधित असलेल्या संचालकांच्या व इतर व्यक्तींच्या ठेवी आणि मालमत्तांची यादी प्रसिद्धी करुन त्यातील ठेवी आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत. शासनाने केलेल्या या कारवाईमुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी मोठी मदत होवून त्या पद्धतीने शासनाला कारवाई देखील करता येणार आहे.

सावळदे पुलावर अपघात, कठडे तोडून ट्रक तापीत

नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांतधिकार्‍यांची नियुक्ती

शासनाने जप्त केलेल्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी/ उपविभाग हवेली जि. पुणे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासनाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

बँकेशी संबंधित 37 मालमत्ताही केल्या जप्त

बीएचआर बँकेशी संबंधित असलेल्या राज्यभरातील 22 ठिकाणांवरील मालमत्ता, प्रमोद रायसोनी यांच्या 12 ठिकाणावरील मालमत्ता, त्यांच्या पत्नी कल्पना रायसोनी यांची 1, सुरजमल बभूतमल जैन यांची 1 ठिकाणावरील तर दिलीप कांतीलाल चोरडीया यांची 1 ठिकाणावरील अशा एकूण 37 मालमत्तांवर शासनाने जप्तीची कारवाई केली आहे. याबातचे आदेश दि. 4 जानेवारी रोजी शासनाच्या गृह विभागाने काढले असून त्याबाबतचा निर्णय जिल्हा न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत.

हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

- Advertisment -

ताज्या बातम्या