Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामेट्रोच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी

मेट्रोच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

भविष्यात शहरात वाहतुकीची होणारी भीषण कोंडी (Transportation problem) लक्षात घेऊन शहरात निओ मेट्रो ( Neo Metro )असावी, यासाठी सततच्या प्रयत्नांना लवकरच यश येणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. निओ मेट्रोला यापूर्वी राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे.

- Advertisement -

वर्ष उलटून गेले तरी केंद्राकडून अद्यापपावेतो मेट्रोला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. भविष्यात शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मान्यता देऊन प्रत्यक्ष कामास प्रारंभ करावा, अशी आग्रही मागणी खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी (Union Urban Development Minister Hardeep Singh Puri)यांच्याकडे केली.

नाशिक शहर आणि परिसरात भविष्यात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे यांनी शहरात मेट्रो व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निओ मेट्रो प्रकल्पाला सन 2019 साली महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे.

दरम्यानच्या काळात केंद्राने राज्याकडून आलेल्या प्रस्तावाची स्कूटनी करून त्रुटी पूर्ण करून घेतल्या आहेत. केंद्र शासनाकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळणेच बाकी आहे. निओ मेट्रोसाठी दोन मार्गिका असणार आहेत. पैकी एक मार्गिका मुंबईनाका-सीबीएस- अशोकस्तंभ-गंगापूर अशी तर दुसरी मार्गिका गंगापूर-सातपूर एमआयडीसी-त्र्यंबकरोड- सीबीएस अशी असणार आहे. या दोन्ही मार्गिका सीबीएस चौकात एकत्र येणार असून तेथून नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत एकच मार्गिका असणार आहे.

मुंबईनाका ते गंगापूर या मार्गीकेचे अंतर बारा किलोमीटर असून यादरम्यान दहा रेल्वेस्थानके असणार आहेत. दुसरी मार्गीका वीस किलोमीटरची असून यादरम्यान वीस स्टेशन असणार आहेत. निओ मेट्रोची मार्गीका एकूण बस्तीस किलोमीटरची असून या दोन्ही मार्गीकांवर एकूण तीस रेल्वेस्थानके असणार आहेत.

या प्रस्तावाची वर्षभरापूर्वीच संपूर्ण स्कूटणी केंद्राकडून पूर्ण झालेली आहे. भविष्यात शहरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी निओ मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मान्यता देऊन तातडीने प्रत्यक्ष कामास प्रारंभ करावा, अशी आग्रही मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या