Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकच्या अंबडमधून; पाहा कसे...?

बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकच्या अंबडमधून; पाहा कसे…?

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad Industrial Area) 5 एकराच्या भूखंडावर डायनामिक प्रेस्टेस (Dynamic prestress) उद्योगाच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांची गूंतवणूक केली जात आहे…

- Advertisement -

IMD : नाशिक, जळगाव, नंदुरबारासाठी हवामान विभागाचा हा इशारा

यातून सुमारे दोनशे लोकांना थेट तर 700 लोकांना उपक्रमांतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे. एमआयडीसी (MIDC) मुख्यालयातून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग जगतातून याचे स्वागत केले जात आहे.

गेल्या काही वर्षात नाशिकला (Nashik) मोठा प्रकल्प (Big Project) यावा यासाठी सातत्याने पाठपूरावा केला जात होता. मात्र भूखंडाच्या उपलब्धते अभावी प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत होत होते. नव्या प्रकल्पामुळे नाशिकच्या लघू व मध्यम उद्योगांना खर्‍या अर्थाने गती मिळेल.

यासोबतच पूरवठादारांनाही नवी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 700 लोकांना रोजगार (Employment) उपलब्ध होणार असल्याने कामगार वर्गातही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यात सिन्नर, सातपूर उद्योग क्षेत्रात 5 युनिट चालविले जात आहेत. या माध्यमातून सुमारे 1100 लोकांना रोजगार मिळत आहे.

पूल बांधणीला लागणार्‍या प्रेस्टेसींग गर्डर व पिलरमध्ये टकल्या जाणार्‍या बिअरिंगच्या उभारणीचे काम प्रामुख्याने केले जाणार आहे. या उत्पादनांना भारतासह (India) बांगलादेश (Bangladesh) व दुबई (Dubai) येथे मोठी मागणी आहे.

डायनामिक प्रेस्टेस उद्योगाला अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे (Ahmedabad-Mumbai bullet train) काम मिळालेले आहे. या माध्यमातून केवळ 50 किमीचा मार्ग हा जमिनीवर राहणार आहे. उर्वरित 490 किमीचा मार्ग हा इलीवेटेड (Elevated) असणार आहे. हे सर्व काम डायनामिक फ्रस्टेड कंपनीला देण्यात आलेले आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यात याचे काम सूरू करण्यात येणार आहे. या कामासाठीच सुमारे 100 ते 150 अभियंत्यांची गरज पडणार आहे. त्यासोबतच कारखान्यातील 100 कामगार व इतर साईटवर 400 ते 500 कामगारांची गरज लागणार असल्याचे कंपनीचे संचालक मारुती प्रभू (Maruti Prabhu) यांनी सांगितले.

कंपनीच्या वतीने देशभरातील मेट्रो पूलासाठी साहित्य पुरविले जात आहे. यासोबतच शिवडी ते न्हावा-शेवा, मरिन ड्राइव्हसह विविध कोस्टल ब्रिजचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जात असल्याचेही रुती प्रभू यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या