जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प लवकरच मार्गी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही
जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प लवकरच मार्गी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District ) उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली, वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil)यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना बैठकीत दिली.

मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक (Meeting for approval of various projects under Water Resources Department) पार पडली. या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत,लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरूण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप यावेळी या बैठकीला उपस्थित होत्या.

मंत्री पाटील म्हणाले, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली, वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामध्ये असणार्‍या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पांची कामे त्वरित सुरू करा : भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्वं गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळर्शीें महाजे, यासह इतर प्रवाही वळण योजना, तसेच पुणेगाव, दरसवाडी आणि दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्णं कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याचबरोबर पार गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोर्‍यात आणले जाणार आहे.या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलीकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे.गोदावरी खो-यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पार -गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक 3 व 4 मंजूर करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री यांच्याकडे भुजबळ यांनी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com