सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया 'या' दिवसापासून होणार सुरु

सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया 'या'  दिवसापासून होणार सुरु

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोना प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ( election Process of cooperative societies )सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या अ, ब, क आणि ड वर्गातील एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली.

निवडणूक होऊ घातलेल्या माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली. निवडणूक होऊ घातलेल्या संस्थांमध्ये प्रामुख्याने राज्यातील 28 सहकारी साखर कारखाने, 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि 26 सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये करोनाची साथ आली. ही साथ नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार 01 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया 1 मार्च 2023 पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

असे आहेत आदेश

सन 2023 मधील निवडणुकीस पात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे 150, 120, 90 आणि 60 दिवस अगोदर सुरु करावी.

संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार कराव्यात.

प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर कारवाई होणार.

वर्गनिहाय संस्था

अ : 63

ब: 1 हजार 14

क : 10 हजार 163

ड: 9 हजार 398

एकूण :20 हजार 638

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com