प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देशाचे राजकारण उभे - संजय राऊत

प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देशाचे राजकारण उभे - संजय राऊत

मुंबई । Mumbai

देशाचे राजकारण (Politics) हे प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभे आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी लेखणी, कुंचला आणि वाणीच्या सहाय्याने शिवसेना (shivsena) उभी केली. त्यावेळी त्यांच्यावर प्रांतीयवादी (Provincialist) असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली. त्या शिवसेनेला ५६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवसेना स्थापन झाल्यावर देशभरातल्या विविध राज्यात प्रादेशिक पक्ष स्थापन झाले. हे पक्ष भूमिपुत्रांचे प्रश्न मांडत राहिले असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे...

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेनंतर संपूर्ण देशात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जी भुमिपुत्रांची भूमिका मांडली तीच भूमिका घेऊन इतरही पक्ष स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात मराठी माणसांचे, देशात हिंदूचे न्याय हक्क यासाठी शिवसेना लढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, खून करणाऱ्या कैद्यालाही मतदानाचा अधिकार आहे. मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Anil Deshmukh & Nawab Malik) यांना मतदानाचा (voting) अधिकार का नाही? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. लोकांनी त्यांना निवड़ून दिले आहे. तरीही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन प्रतिनिधींना मतदानाचा हक्क नाकारला जातो आहे. या दोन्ही सदस्यांना कोणत्या न्यायाने मतदान अधिकार नाकारला गेला त्याविषयी संभ्रम असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीची दोन मते कमी करण्यासाठी पडद्यामागून हा खेळ सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच हॉटेल पॉलिटिक्सविषयी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, “राज्यसभा (Rajya Sabha) असो की विधानपरिषद (Legislative Council) निवडणुकीची प्रक्रिया पाहता आमदारांना प्रशिक्षणाची गरज असते. पहिले प्राधान्य, दुसरे प्राधान्य हे ठरवण्यासाठी सर्व आमदार (mla) एकत्र आले तर त्यांना मार्गदर्शन केले जाते. आधी हे होत नव्हते, आता होत आहे. कारण महाराष्ट्रातील विरोधीपक्ष भाजपाकडे (bjp) केवळ दोन मते अधिक आहेत आणि जिंकण्यासाठी त्यांना २० मते हवी आहेत. ते कोठून आणणार आहेत?” असा प्रश्नही यावेळी त्यांनी विरोधकांना विचारला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com