राम मंदिरासाठी ही दिग्गज मंडळी जाणार

माेजक्या ३०० जणांना निमंत्रण
राम मंदिरासाठी ही दिग्गज मंडळी जाणार

नवी दिल्ली। New Delhi

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या भूमीपुजनाला काेण-काेण जाणार? काेणाला निमंत्रण पाठवले आहे? याची जाेरदार चर्चा दाेन दिवसांपासून सुरु आहे. त्यात महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. ते भूमिपूजनाला जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी (Lalkrushan Adavani) आणि मुरली मनोहर जोशी यांचा सुद्धा समावेश आहे.अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे, असे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचे या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेले आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठे योगदान दिले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com