टोल नाक्यावर पोलीस अधीक्षकांची गाडी अडवली

टोल कर्मचाऱ्यांकडून अधीक्षकांना अरेरावी
टोल नाक्यावर पोलीस अधीक्षकांची गाडी अडवली

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

गेल्या आठवड्यात टोल कर्मचाऱ्याने ( Toll Plaza Employee ) एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केली असल्याची घटना ताजी असताना आता चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी (police superintendent's car)अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची घटना पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ( Pimpalgaon Baswant toll plaza)घडली असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोल नाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांची गाडी जात होती ती टोल नाकेच्या लेन जवळ आली स्वातंत्र्यलैन बंद असल्याने गाडी दुसऱ्या लेणला गेली मात्र 15 ते 20 मिनिटे होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com