Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्रत खांदेपालट! 'परिवर्तन'चा विजयी गुलाल

मविप्रत खांदेपालट! ‘परिवर्तन’चा विजयी गुलाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. मविप्रत ‘प्रगती’च राहणार की ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निकाल हाती लागले असून तब्बल २० वर्षांनंतर मविप्र संस्थेत खांदेपालट झाले आहे…

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर मतमोजणीचा दिवस उमेदवारांचे समर्थक, सभासदांसाठी क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरत असल्याचे चित्र सकाळपासूनच होते.

सुरूवातीपासूनच अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीमध्ये यंदा साम-दाम तंत्राचाही उपयोग केला गेल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. कधी नव्हे तो राजकीय आखाड्यासारखेच स्वरूप या निवडणूकीस यंदा प्राप्त झाल्याने मतमोजणीचा दिवसही सभासदांची अतिशय उत्कंठा वाढविणारा ठरला.

मराठा हायस्कूलच्या आवारातील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात मतमोजणी केंद्रास सकाळपासूनच छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सभागृहात सर्व यंत्रणे आणि साधनांसह निवडणूक मंडळाने २४ टेबल्सवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उमेदवार व त्यांच्यासमवेत दोन सभासद प्रतिनिधींशिवाय इतर कुणासही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे सकाळचे वातावरण पोलिसांमुळे शिस्तबद्ध दिसून आले.

आता एक-एक निकाल हाती येत आहे. परिवर्तनच्या समर्थकांनी थोड्याच वेळापूर्वी फाटकाच्या आतिषबाजीत विजयी दिवाळी साजरी केली आहे. तसेच विजयी मिरवणुकाही काढण्यात येत आहेत. सर्वच जागांवर परिवर्तनची घोडदौड सुरू असताना परिवर्तन पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांचा निसटता पराभव परिवर्तनाच्या विजयी उमेद्वारांमध्ये खटकल्याचे दिसून आले. गड आला पण सिंह गेला या म्हणीचा उच्चार मतमोजणीच्या वेळी होत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या