कागद उद्योग अडचणीत

कच्च्या मालाच्या किमतीत 50 टक्के वाढ
कागद उद्योग अडचणीत

नाशिक । रवींद्र केडीया Nashik

इंधन दरवाढीसोबतच (Along with fuel price hike )आयात मालाची व भाड्यातील दरवाढ ( Freight Increased ) व वाढलेली कागदाची निर्यात यामुळे देशांतर्गत कागदाच्या किमतीत सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.त्यामुळे भारतीय कागद उत्पादक (

Paper manufacturer ) लघु मध्यम उद्योग अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

भारतात कागदाचे उत्पादन कमी प्रमाणात केले जाते.कच्चा कागद हा मोठ्या प्रमाणात अमेरिका व युरोपीयन देशातून आयात केला जातो. त्यांवर प्रक्रिया करुन भारतात कागद उपलब्ध होत असतो. करोनाच्या लॉकडाउन काळात संकलन कमी झाले.त्यानंतर अचानक मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. .

आयात ( Import )होणार्‍या कागदाच्या उत्पादनांत अमेरिका किंवा युरोपियन देशांची मोठी दादागिरी आहे. त्यांच्याकडून पाठवल्या जाणार्‍या वस्तूंच्या यादीत कागद हा शेवटच्या स्थानावर येतो. त्यामुळे बाहेरच्या देशातून कागदाच्या आणण्याला शिपींग व कंटेनरची नेहमीच वानवा राहते. त्यासोबतच शिपींगच्या भाड्यात दहा पट वाढ केल्याने आपोआपच येणारा कच्चा माल महाग झाला. त्याचा परिणाम कागदांच्या कच्चा मालावर होऊन अखेर उत्पादनांवर झाला असल्याचे चित्र आहे.

प्रत्यक्षात पाहिले तर भारतांतर्गत मागिल वर्षभरात कागदाला फारशी मागणी वाढली नाही. परिणामी कच्चा माल कमी प्रमाणात साठवला गेला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. तसे पाहिले तर पूर्वी जगात भारतीय कागदांना फारशी मागणी राहत नसे. गेल्या काही वर्षात भारतीय उत्पादकांनी दर्जेदार कागदांचे उत्पादन करुन परदेशात भारतीय कागदाची बाजारपेठ निर्माण केली आहे.

त्यामुळे निर्यातीचा ओढा वाढल्यानेे देशांतर्गत कागदाचा तूटवडा जाणवू लागल्याने पर्यायाने कागदाचे दर वाढण्यास मदत झाली असल्याचे मत उत्पादक व्यक्त करताना दिसून येत आहेत. .भारतातून बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, श्रीलंका, तुर्की, कतार, दोहा आदींसह विविध देशांना कागद पाठवला जातो. देशांतर्गत विक्रीपेक्षा या देशांमध्ये चांगला भाव मिळत असल्याने उद्योजक निर्यातीवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.त्यामुळे देशांतर्गत कागदाची उपलब्धता कमी होत असल्याने दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे.काही अंशाने या दरवाढीत इंधन दरवाढीचाही परिणाम झालेला असल्याचे चित्र आहे.

अनेक लघु, मध्यम उद्योगांना कच्चा माल मिळत नसल्याने दोन शिफ्टमध्ये होणारे उत्पादन एक शिफ्टमध्ये करावे लागत आहे.कागदाला गुणवत्ता आणण्यासाठी त्यावर काही रासायनिक प्रक्रिया करावी लागते.ती प्रक्रिया करणारी रसायने देखिल आयात करावी लागतात. या सर्व गोष्टींचा विपरित परिणाम उद्योगांवर होत असून कामाचे तास दिवसेंदिवस कमी होऊ लागलेले आहे. पूर्वी पाण्याच्या बाटल्या या खोक्यात पॅक होत होत्या. हल्ली त्या स्रींक रॅपरमध्ये गुंडाळल्या जात आहे. या पाण्याच्या पॅकींगसाठी लागणारे 2 हजार टन बॉक्सची मागणी 10 ते 15 टक्क्यांवर खाली आली आहे.

वर्षभरात बदललेले दर

पांढरा कागद पूर्वी 40 रुपये होता. तो आता 70 रुपये झाला आहे. ब्राउन पेपर पूर्वी 22 रुपये होता. तो आता 45 रुपये झाला आहे. पूर्वी जीएसटीचे दर कच्चा माल खरेदी व तयार माल विक्रीला सारखे होते. आता तयार मालावर 6 टक्क्यांनी वाढ केली आहे.

लघुउद्योजकांची कोंडी

शासनाने कागदाच्या निर्यातीवर काही बंधने टाकावीत, कच्चा मालावरील सरकारी कर कमी करावे,भारतात माल आणण्यासाठी शिपींगचे वाढलेले दर कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणी करावीत यासारखी पावले उचलून सरकार या उद्योगाला बळ देऊ शकणार आहे.अन्यथा आज लघू उद्योजकांची कोंडी झालेली आहे.तरुण या व्यवसायाकडे अभावानेच वळतील

राजू छाजेड, उद्योजक

Related Stories

No stories found.