Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापांजरापोळचा वाद; शिळ्या कढीला ऊत

पांजरापोळचा वाद; शिळ्या कढीला ऊत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्योग विस्तारासाठी लागणार्‍या जागेची मागणी ही अनेक वर्षांपासून आहे. 2014 साली म्हणजेच 9 वर्षांपूर्वी निमाच्या माध्यमातून पांजरापोळच्या (panjarapol) जागेची मागणी उचलून धरली होती. तत्कालीन उद्योग मंत्री अशोक चव्हाण तसेच तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सातत्याने या पांजरापोळच्या संचालकांशी चर्चा करुन जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

त्यावेळी सदर जमिनीवर वनराई असल्याचे पांजरपोळच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. त्याची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी उद्योजकाना घेऊन विशेष 6 ते 7 बसेसच्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली होती तेव्हापासून आजपर्यंत पांजरापोळ संचालकांच्या म्हणण्यानुसार ही जागा वनक्षेत्रच आहे त्याच वेळी उद्योजकांनुसारं ही जागा पडीत आहे. याबाबत प्रशासन अजुनही पाठपुरावा करीत आहे.

राजकिय नेत्यांचाच वाद

दरम्यान राजकीय नेत्यांच्या उलटसुलट भूमिकांमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर असताना छगन भुजबळ यांच्याकडे हा प्रश्न मांडण्यात आला होता. त्या दृष्टीने शासन दरबारी व पांजरापोळ ट्रस्टच्या अधिकार्‍यांशी चर्चाही झाली होती. मात्र नंतर हा विषय पुन्हा एकदा थंड बासनात गेला.

आता निमा, आयमाने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे पुन्हा पांजरापोळच्या जागेची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम नाशिकच्या आमदार सिमा हिरे व मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे या दोन्ही आमदार या प्रश्नाबाबत परस्परविरोधी भूमिका घेत उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. आ. फरांदे यांनी उद्योजकांसमवेत मंत्री उदय सामंत (उदय सामंत) यांची भेट घेऊन ही जागा हस्तांतरित करावी अशी मागणी केली होती. तर पर्यावरणाचा र्‍हास होणार असल्याने पांजरापोळच्या जागेवर वनराई तशीच ठेवण्याची मागणी आ. सिमा हिरे यांनी केली आहे.

या विरोधामध्ये मनसेनेने उडी घेतली आहे. ऑक्सिजन देणारी फॅक्टरी (factory) म्हणूनही पांजरापोळची जागा ओळखली जाते. त्यामुळे ही जागा संपादित करू नये तसेच कारखान्यांना विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा समतोल राखत शहराच्या या ऑक्सिजन बँकेचे रक्षण करणे गरजेचे असल्याची भूमिका मनसेनेने घेतली आहे.

चुंचाळे शिवाराच्या परिसरात पांजरापोळची जवळपास 827 हेक्टर जमीन यापूर्वी भुजबळ हे पालकमंत्री असताना हुडकोच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र त्यावेळी पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्यानंतर या हालचाली बंद झाल्या होत्या. नवीन औद्योगिक वसाहतीला जागा नसल्याचा मुद्दा उपस्थित कंरत भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी उद्योजकांच्या संघटनांना सोबत घेत अंबड औद्योगिक वसाहतीला (Ambad Industrial Estate) लागून असलेल्या पांजरापोळची जवळपास 827 हेक्टर जागा संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी उद्योग मंत्र्यांना साकडे घातले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आता अतिरिक्त एमआयडीसीसाठी शासनाने चालू बाजारभावाने जागा ताब्यात घेऊन पांजरापोळसाठी ग्रामीण भागात अन्यत्र जागा द्यावी, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी तातडीने जिल्हाधिकार्‍यांना प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या