चौक मंडईत वाडा कोसळला; दोन जखमी

चौक मंडईत वाडा कोसळला; दोन जखमी

जुने नाशिक | प्रतिनिधी

जुन्या नाशकातील ( Old Nashik ) चौक मंडई ( Chowk Mandai ) बुरूड गल्ली ( Burud Galli ) भागातील एक जुना वाडा आज रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान कोसळला .

दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस तसेच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

. युनुस इब्राहिम शेख- वय वर्षे ५५; कादीर युनुस शेख वय वर्षे -३०, रा. बागवानपुरा, नाशिक हे दोन इसम रस्त्याने जात होते त्यांच्या अंगावर भिंत कोसळली आहे .दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com