भूकंप बळींचा आकडा पाच हजार पार

तुर्कस्तान, सिरीयात मदतकार्याला वेग
भूकंप बळींचा आकडा पाच हजार पार

अंकारा। वृत्तसंस्था Ankara

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपातील ( Earthquakes in Turkey and Syria )मृतांची संख्या 5,151 वर पोहोचली आहे. हजारो लोक जखमी आहेत. अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत. बचाव पथके ढिगार्‍यांमधून वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. कोसळलेल्या इमारतीखालून वाचवण्यात आलेल्यांमध्ये घानाचा फुटबॉलपटू ख्रिश्चन अत्सूचा समावेश आहे.

दरम्यान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी 10 राज्यांमध्ये एर्दोगान यांनी 10 राज्यांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. या भागांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एर्दोगान म्हणाले की, 70 देशांनी तुर्कीला मदत पाठवण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2500 मृतदेह ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 4,825 वर पोहोचला आहे. तुर्कियेत 3,381 लोकांचा मृत्यू झाला आहे. 15,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, सीरियामध्ये 1,444 लोकांचा मृत्यू झाला. तर 2 हजारांहून अधिक जखमी झाले. मोठ्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली अजूनही लोकांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान मोदी भावुक

तुर्कियेतील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी भावूक झाले. ते म्हणाले की, ’तुर्किये आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे, ते मी समजू शकतो. 2001 मध्ये भूजला भूकंप झाला. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. बचाव कार्यात काय अडचणी येतात, याची जाणीव मला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com