Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामालेगावी करोनाचा उद्रेक; एकाच दिवशी 'इतके' पॉझिटिव्ह

मालेगावी करोनाचा उद्रेक; एकाच दिवशी ‘इतके’ पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या (Corona Patients) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात १२८ नवे करोनाबाधित रुग्ण (Corona Patients) आढळले आहेत…

- Advertisement -

चिंताजनक बाब म्हणजे आज मालेगाव क्षेत्रात २१ रुग्ण आढळले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर मालेगाव सारख्या संवेदनशील क्षेत्रात दोन आकडी करोना रुग्ण आढळले आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगावला दौरा होता. या दौऱ्यात करोनाचे नियम पाळले नसल्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

मालेगाव जिल्हा निर्मिती : …म्हणून भाजप आमदाराचा विरोध, एमआयएमचा पाठींबा

सध्या एकूण ६०२ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ७५ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

बोलताना भान राखावे, मराठी माणसामुळेच…; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सुनावले

मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज २१ रुग्ण आढळले आहेत तर ०३ जिल्हाबाह्य रुग्णांची नोंद आज करण्यात आली आहे. आज करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.

मुख्यमंत्री शिंदेंनी ‘त्यांना’ दिली घराची चावी अन्…

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आज १०७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज; उध्दव ठाकरेंची जहरी टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या