काळजी घ्या! जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी करोनाची (Corona) संख्या नाशिककरांसाठी पुन्हा धोक्याची घंटा ठरत आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) दिवसभरात तब्बल ६९ करोनाबाधित (Corona Positive) आढळून आले...

त्यात नाशिक महापालिका (Nashik NMC) हद्दीतील सर्वाधिक ३४ रुग्ण आहेत. तर ३१ ग्रामीणमधील (Nashik Rural), दोन मालेगावातील (Malegaon) व दोन जिल्हाबाह्य आहेत. यामुळे उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांची संख्या आता ४०० च्या उंबरठ्यावर पोहचली आहे. दिवसभरात ७० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

राज्यात पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकमध्ये देखील करोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचा आकडा वाढतांना दिसत आहे. गेल्या रविवारी (दि. २६ जून) तब्बल ५५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

तर मंगळवारी (दि. २७) बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त अधिक होते. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २०० च्या आत आली होती. परंतु, मंगळवारी (दि. २८) करोना रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतल्याने दिवसभरात तब्बल ८२ रुग्ण बाधित आढळून आले होते. त्यानंतर मात्र बाधितांच्या बरोबरीने करोनामुक्तांची संख्या दिसून आली. आता जुलैचा प्रारंभ होताच रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com