Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादिलासा : जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या घटली

दिलासा : जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या घटली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

- Advertisement -

मागील चोवीस तासात 491 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 401 रूग्णही पुर्ण बरे झाले आहेत. यामुळे करोनावर मात करणारांचा आकडा 80 हजार 123 वर पोहचला आहे.

मागील आठ दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 491 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 530 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 59 हजार 083 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 155 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 25 हजार 86 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 16 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 30 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 662 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 401 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 80 हजार 123 वर पोहचला आहे.

करोनामृत्यूमध्येही घट झाली असून दिवसभरात 13 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 10 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 591 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. दिवसभरात केवळ 803 नवे संशयित दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या