Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७७६३ वर

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ७७६३ वर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात ३७८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ७ हजार ७६३ झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून १०२८ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात २३५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ३७८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील २८३ रूग्ण आहेत. यात शहरातील हिरावाडी, कामगारनगर, वाल्मिकनगर , गणेशवाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , औरंगाबादरोड , जुळजाभवानीनगर , टाकळीरोड , गोरेवाडी, नाशिकरोड, पंचवटी, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, गौतमनगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ४ हजार ६६१ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील ७७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १ हजार १६३ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ओझर, विल्होळी, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लहवीत, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज २३ रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार १६३ वर पोहचला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १३९ वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात १० जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक रूग्ण नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३५९ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील २३५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ५ हजार २०१ वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार २८ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ८१५ आहेत. जिल्हा रूग्णालय ११, ग्रामीण १४३, मालेगाव ८, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ११ व होम कोरोंटाईन ४० रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून ३० हजार ६१९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २२ हजार ९६ निगेटिव्ह आले आहेत.७ हजार ७६३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार १४४ रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ७७६३

* नाशिक : ४६६१

* मालेगाव : ११६३

* उर्वरित जिल्हा : १८००

* जिल्हा बाह्य ः १३९

* एकूण मृत्यू: ३५९

* कोरोनमुक्त : ५२०१

- Advertisment -

ताज्या बातम्या