जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १०३९४ वर
मुख्य बातम्या

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १०३९४ वर

२४ तासात ३६९ पॉझिटिव्ह रूग्ण

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून अनेक नव्या गावांमध्ये तसेच शहरातील उपनगरांमधील गल्ली बोळात करोनाचे रूग्ण आढळत आहेत. आज चोवीस तासात जिल्ह्यात ३६९ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या आकडा १० हजार ३९४ इतका झाला आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून १ हजार १३७ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ३६९ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये एकट्या नाशिक शहरातील २८६ रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, जेलरोड, पंचवटी, सातपुर गाव, कामगारनगर, इंदिरानगर, रामवाडी, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , अशोकनगर, नाशिकरोड, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ६ हजार ३५६ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील ७० पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २ हजार ६६७ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावत आज १३ रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार २१७ झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १५४ वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात ८ जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ५ रूग्ण नाशिक शहरातील २ ग्रामिण भागातील तर १ मालेगाव येथील आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ४२० झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील ४०० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ७ हजार ३७० वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार १३७ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक ७६५ तर उर्वरीत जिल्ह्यातील १९४ आहेत. जिल्हा रूग्णालय ११, मालेगाव ६, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ८ व होम कोरोंटाईन १५३ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून ३७ हजार ३९४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २५ हजार ७२२ निगेटिव्ह आले आहेत. १० हजार ३९४ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ६६४ रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: १०,३९४

* नाशिक : ६३५६

* मालेगाव : १२१७

* उर्वरित जिल्हा : २६६७

* जिल्हा बाह्य : १५४

* एकूण मृत्यू : ४२०

* कोरोनमुक्त : ७३७०

Deshdoot
www.deshdoot.com