करोना अपडेट
करोना अपडेट
मुख्य बातम्या

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ८०९४ वर

२४ तासात ३३१ पॉझिटिव्ह रूग्ण

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात ३३१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ८ हजार ९४ झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून ८७८ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात १८५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ३३१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील १७३ रूग्ण आहेत. यात शहरातील हिरावाडी, कामगारनगर, वाल्मिकनगर , गणेशवाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , औरंगाबादरोड , जुळजाभवानीनगर , टाकळीरोड , गोरेवाडी, नाशिकरोड, पंचवटी, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, गौतमनगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ४ हजार ८३४ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील १४४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १ हजार ९४४ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ओझर, विल्होळी, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्‍वर, घोटी, इगतपुरी, लहवीत, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज ११ रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार १७४ वर पोहचला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १४२ वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात ६ जणांचा मत्यू झाला.

यामध्ये सर्वाधिक रूग्ण नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३६५ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील १८५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ५ हजार ३९४ वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने ८७४ संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ६०१ आहेत. जिल्हा रूग्णालय ७, ग्रामिण १८३, मालेगाव ३०, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ४ व होम कोरोंटाईन ५३ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून ३१ हजार ८९७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २२ हजार ८२२ निगेटिव्ह आले आहेत. ८ हजार ९४ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ३३५रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ८०९४

* नाशिक : ४८३४

* मालेगाव : ११७४

* उर्वरित जिल्हा : १९४४

* जिल्हा बाह्य ः १४२

* एकूण मृत्यू: ३६५

* कोरोनमुक्त : ५३९४

Deshdoot
www.deshdoot.com