Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकसह राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेत जबरदस्त वाढ

नाशिकसह राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेत जबरदस्त वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील सप्ताहात नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) संपूर्ण राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट झाली. त्यामुळे सध्या रात्री थंडी (Cold) तर दिवसा ऊन, प्रचंड उष्णता (Heat) असे वातावरण आहे….

- Advertisement -

मात्र, यात पुन्हा बदल होऊन पुढील तीन दिवस जिल्ह्यात तापमान (Temperature) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण गुजरात राज्य (विशेषतः जामनगर जुनागड राजकोट जिल्हे व नलिया) व महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, ठाणे मुंबई तालुके व शहरी क्षेत्र तसेच संपूर्ण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. १७ मार्चपर्यंत ३८ ते ४० डिग्री तापामानापर्यंत वाढ होऊन चांगलीच उष्णता जाणवू शकते.

शुक्रवार दि. १८ मार्चपासून पुन्हा तापमान कमी होऊन पारा २ ते ३ डिग्रीने खाली येऊ शकतो.
पुढील ८ दिवस म्हणजे सोमवार दि. २१ मार्चपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पाऊस किंवा गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळे पिके काढणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या