
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नवीन नाशिक व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दै.'देशदूत' आयोजित व 'ललित रुंगटा बिल्डर्स' प्रायोजित 'नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो'चा शानदार समारोप करण्यात आला.
प्रदर्शनाच्या तीनही दिवस नवीन नाशिकवासीयांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणार्या 'नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून 'देशदूत' वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली.
तीन दिवसांत लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवंतांना साई संस्कृती पैठणी कडून सेमी पैठण्या व मलबार गोल्ड अँड डायमंडस् तर्फे चांदीची नाणी देण्यात आली.
एक्स्पोचे इव्हेंट पार्टनर स्पायडर मीडिया हाऊस, तर पर्यावरण पार्टनर पापायाज् नर्सरी हे होते. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या 7 दिवसाच्या आत महात्मा गांधी रोड येथील दै. 'देशदूत' कार्यालयात संपर्क साधून ओळखपत्र दाखवून आपले बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन 'देशदूत'तर्फे करण्यात येत आहे.
लकी ड्रॉ विजेते
दै.'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले व 'नावा'चे अध्यक्ष प्रवीण चांडक यांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेते घोषित करण्यात आले.
सेमी पैठणी विजेते : शैला नेरकर, काशिनाथ माळी, प्रतिभा तरळ,
चांदीचे नाणे विजेते: देविदास मराठे, विष्णू चव्हाण, निलेश सोनार