
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
इकडे तिकडे बघण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपल्या पक्षाच काय ते बघावे, आणि भविष्यात कुठ रहाल त्याचा शोध घ्यावा. बाहेर तुमच काहीच राहिल नसून शेजार्याला पोरग झाल (Boy to the neighbor) म्हणून आपण पेढे (share sweet) वाटायचे, आपण वांझोटे आहात का? अशी जहरी टिका ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Rural Development Minister. Girish Mahajan) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर केली.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर राज्याचे ग्रामविकास व क्रिडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निकालावर बोलतांना ना. महाजन म्हणाले की, कर्नाटक मध्ये आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं काम झालेलं नाही. आम्ही कमी पडलो का कमी पडलो याचा नक्की शोध घेणार असून इतक्या कमी जागा आपल्या येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती. या सार्या बाबींचं आत्मपरीक्षण करू कारणमीमांसा करणार आहोत
. एक राज्य जिंकलं म्हणजे द्वेषाची दुकानदारी बंद झाली आणि प्रेमाची दुकानदारी सुरू झाली असं होत नाही. यूपीत निवडणुका झाल्या तेव्हा तुमचं प्रेम कुठं होतं, तिथं काँग्रेसची वाईट हार झाली काही ठिकाणी अँटी इन्कमबन्सी असते खूप दिवसांनी त्यांना विजय मिळाल्याने ते हुरळून गेले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
हनुमानाची गदा पाहण्यापेक्षा धनुष्यबाण कुठे ते बघा
ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्या शिवसेनेच बघावे. तुमची शिवसेना, तुम्ही कुठं आहात ते बघा, भविष्यात कुठं राहाल याचा शोध त्यांनी घ्यावा. हनुमानाची गदा पाहण्यापेक्षा तुमचा धनुष्यबाण कुठं आहे ते बघा. तुमचा धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलेला नाही, तुमचे आमदार खासदार तुमच्याकडे राहिले नाहीत महाराष्ट्रात तुमचं काय आहे ते दाखवा, बाहेर तर तुमचं काहीच नाही. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना सारखी झाली असल्याची टिका देखील ना. महाजन यांनी केली.