ठाकरे गटाला खिंडार: बंडखोरीला कारणीभूत मुद्यांचा मागोवा घेण्याची गरज

jalgaon-digital
8 Min Read

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या (Nashik) शिवसेनेला (shiv sena) मोेठे खिंडार पडल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता दिसून येत असली तरी ही बंडखोरी (Rebellion) अचानक झालेली नाही. या मागे अनेक दिवसांपासून शिजत असलेले कट, कारस्थान, नाराजी नाट्य कारणीभूत आहे काय हे तपासण्याची गरज आहे.

पक्ष संघटना वाढीसाठी एकत्रित काम करणार्‍या शिवसैनिकांमध्ये (shiv sainik) अचानक कोणता मुद्दा बंडखोरीला कारणीभूत ठरला, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ठाकरे गट (Thackeray group) पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचवेळी आणखी ‘दुसरा लॉट’ लावकरच बाहेर पडणार असल्याचे सूतोवाच शिंदे गटाकरुन सारखे केले जात आहे. या गोष्टीकडे केवळ वावडी म्हणून न पाहता त्यातील तथ्य तपासण्याची वेळ असल्याचे बोलले जात आहे.

खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नुकतेच नाशिक भेटीत खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्यावर कठोर शब्दात टीका करीत ‘मच्छर’ संबोधले होते. त्यापाठोपाठ सातत्याने टिकांची मालिका चालली होती. त्याचे पडसाद या माध्यमातून उमटले आहेत की काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दादा भुसे (dada bhuse) यांना मानणारा वर्ग मोठा आहे. दादा भुसेंंचे नातेगोते, मित्र परिवार नाशिकमध्ये मोठा आहे. त्यांच्या दबावाच्या माध्यमातून काही शिवसेनेच्या ज्येष्ठांनी पक्षांतर केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना पूर्वी दोन गटात विभागलेली होती.

निवडणुकांच्या (elections) तोंडावर सेना एकसघ करण्यासाठी संजय राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करुन दोनही गटांतील वाद शमवून दिलजमाई केली होती. मात्र एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर वातावरणात फरक पडत गेला. त्याचा परिणाम या बंडखोरीच्यां माध्यमातून दिसून येऊ लागला असल्याचीही चर्चा आहे. कार्यकर्ते नगरसेवकांशी तूटत चाललेला संवाद व पक्षाच्या मुख्य घडामोडीत त्यांचे नगण्य अस्तित्व असण्यातून नाराजी वाढल्याचे एका गटाचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडीतून आणखी माजी नगरसेवक (formre corporator) शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता शिंदे गट पदाधिकार्‍यांकडून वर्तवली जात असताना ठाकरे गटाच्या माध्यमातून आत्मचिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. या पार्शभूमीवर पुढील बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे सर्वोंचे लक्ष लागलेले आहेत.

बालेकिल्यालाच सुरूंग; पदाधिकारी अस्वस्थ

जून महिन्यात सरकार कोसळले, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील (Shiv Sena Thackeray group) तब्बल 41 आमदार व 13 खासदार शिंदे गटात सामील झाले त्यानंतर भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) व शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन राज्याच्या मुख्यमंत्री (Chief Minister) पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली.

यानंतर मूळ शिवसेनेला (shiv sena) राज्यात अनेक ठिकाणी खिंडार पडले नाशिक शहरातही खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटाची साथ धरली मात्र पाहिजे त्या प्रमाणात गेल्या पाच महिन्यात शिंदे गटाला नाशिक शहर व जिल्ह्यातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ठाकरे गट शिवसेना टिकून राहिले. मात्र खासदार संजय राऊत यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जी टीका केली. ती काही शिवसैनिकांच्या व नगरसेवकांच्या जिव्हारी लागली. त्यामुळेच काही नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

नाशिक शहरातील 12 नगरसेवक व काही शिवसैनिक शिंदे गटात नुकतेच सामील झाले त्याच प्रामुख्याने नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे ,ज्योती खोले, जयश्री खरजुल हे शिवसेनेचे चार नगरसेवक तर प्रताप मेेहरोलिया हे माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्याचप्रमाणे राजू लवटे, श्याम खोले हे सुद्धा शिंदे गटात सामील झाल्याने एक प्रकारे नाशिक रोड शिवसेनेला मोठे खिंडार पडले. सदरचे नगरसेवक शिंदे गटात गेल्याने त्यांचे समर्थक काही शिंदे गटात सामील होणार हे निश्चित आहे. त्यामुळे एक प्रकारे नाशिक रोडच्या शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे.

मुळातच जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा अनेक शिवसैनिक नाराज होते कारण गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. परंतु भविष्यकाळात महाविकास आघाडीने निवडणुका एकत्र लढविल्या तर अनेकांचे पत्ते कट होण्याचे चित्र इच्छुक उमेदवारांना समोर दिसत होते. त्यामुळेच ठाकरे गटातून या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून, सर्वात जास्त देवळाली मतदार संघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोडणार नाही. हे आत्ताच अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तब्बल तीस वर्ष असलेल्या हा शिवसेनेचा बालेकिल्ला आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस कडे जातो की काय? असा सवाल ठाकरे गटातील शिवसैनिक करत आहे. परिणामी माजी आमदार योगेश घोलप हे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वसामान्य शिवसैनिक व देवळाली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या विकासासाठी शिंदे गटात : बोरस्ते

आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत कुरबुरी व टोमणेबाजी सुरू होती. यामुळे मानसिक त्रास झाला. पक्ष सोडून जावा असे काहींनी प्रयत्न देखील केले, चुकीच्या अफवा पसरवल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण नाशिकच्या विकासासाठी प्रवेश करत असल्याचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेशकर्त्या झालेल्या माजी नगरसेवकांना दलाल व गद्दार असा उल्लेख केल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना खा. संजय राऊत यांचे नाव न घेता बोरस्ते यांनी त्यांच्यावर पलटवार केला. नाशिकमध्ये केवळ पर्यटनासाठी येणारे व सिल्वर ओकचे दलाल कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दलाल व गद्दार असे शब्द प्रयोग करून चारित्र्य हनन केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर 11 माजी नगरसेवकांचे नेतृत्व करणार्‍या बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे शहर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्रिकोणाची एक बाजू अर्थात नाशिकचा विकास ठप्प झाला आहे. औरंगाबाद ठाणे व नागपूरच्या तुलनेत नाशिककडे दुय्यम अंगाने बघितले जाते.

वास्तविक सर्व प्रकारच्या क्षमता असताना नाशिकचा हवा तसा विकास झालेला नाही. विकासासाठी राजकीय दूरदृष्टी व पाठबळ हवे असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिकच्या विकासाची दृष्टी बदलली आहे. नाशिकच्या विकासाकडे बारकाईने पाहिले जात आहे. आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा शब्द दिल्याने आम्ही शिंदे गटात प्रवेश केला, असा दावा बोरस्ते यांनी केला.

ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कामे बाजूला ठेवून नाशिकचा दौरा केला. यावेळी अपघातग्रस्तांची चौकशी करून अपघात परवाना क्षेत्रांच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नाशिकबद्दल शिंदे यांच्या मनात अस्ता आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नाशिकच्या विकास होऊ शकतो. नाशिकचा विकास रोखण्याचा कपाळा करंटेपणा आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश केला असा दावा अजय बोरस्ते यांनी केला.

आणखीही प्रतीक्षेत

शिवसेनेच्या ठाकरे गटात नाराजांची संख्या खूप मोठी असून लवकरच आणखीही माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होण्यास तयार असल्याचे सूतोवाच खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी केले. या अकरा जणांचा प्रवेश मागेच होणार होता. काही कारणामुळे त्याला विलंब झाला. आणखी बरेच जण संपर्कात असून लवकरच त्यांची नावे जाहीर करून त्यांचा प्रवेशसोहळा पार पडेल, असे खा. गोडसे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *