एनडीएचे शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA’s presidential candidate Draupadi Murmu) यांनी संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, पीयूष गोयल आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांकडून समर्थन मागितले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समर्थन मागितले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *