Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासमीर वानखेडेंना दिलासा; नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता

समीर वानखेडेंना दिलासा; नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने शुक्रवारी एका खटल्याच्या सुनावणीत वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) दिले आहेत…

- Advertisement -

समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे उपलब्ध कागदपत्रांनुसार अनुसूचित जातीचे आहेत, असे म्हटले आहे. याआधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप केला होता.

IPL 2022 Mega Auction : मनीष पांडे लखनौ सुपर जायंट्स संघात

त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे.

आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११,४९९,५०३,५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटिसा पाठवल्या होत्या, पण त्यापैकी कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही.

IPL 2022 Mega Auction : पहिल्या दिवशी 161 खेळाडूंवर लागणार बोली; ‘या’ खेळाडूचे सात वर्षानंतर पुनरागमन

२६ ऑक्टोबर २०२१ रोजी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने समीर वानखेडेविरुद्धच तपास सुरू केल्याचा आरोप आहे.

दिलासादायक! देशातील करोना रुग्णांची संख्या घटली; ‘पाहा’ आजची स्थिती

त्यांच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झाला नाही. त्यानंतर आता सुनावणीत आयोगाने एसआयटी बरखास्त करण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीएससीच्या आदेशानुसार, तक्रारीच्या प्रतीसह काय कारवाई केली, याचा अहवाल राज्याने ७ दिवसांच्या आत आयोगाला सादर करायचा आहे. तसेच महाराष्ट्र राज्य समितीला समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया वेगवान करून महिनाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या