थकबाकी वसूलीसाठी मनपाचा 'ढोल' पून्हा वाजणार

थकबाकी वसूलीसाठी मनपाचा 'ढोल' पून्हा वाजणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेने ढोल (drum) बजाओ मोहिमेद्वारे घरपट्टीची (house tax) तब्बल दहा कोटी रुपयांची थकबाकी (arrears) मागिल वर्षी वसुल केली होती. त्याच प्रणालीचा अवलंब याही वर्षी करण्यात आला होता.

वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांच्या स्थगितीनंतर ‘ढोल बजाओ मोहीमे’द्वारे वसूलीला पुन्हा प्रारंभ करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी दिले आहेत.

नव्याने मोहीम सूरू करताना यावेळी 50 हजारांवरील थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर ठेवण्यात येणार असून, लवकरच या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. कोरोना (corona) महामारीच्या काळात सलग दोन वर्षे महापालिकेची करवसुली (Tax recovery) ठप्प राहिल्याने घरपट्टी (house tax) व पाणीपट्टीच्या (water tax) थकबाकी पाचशे कोटींच्यावर गेली होती.

कोरोना सरल्यानंतरही थकबाकी भरण्यासाठी करदात्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने सुरूवातीला अभय योजना आणि नियमित करदात्यांसाठी सवलत योजना आणली. मात्र थकबाकीचा डोंगर कायम राहिल्याने थकबाकीदारांविरोधात कटू कारवाईचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरपासून थकबाकीदारांविरोधात ढोल बजाओ मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

या मोहिमेच्या पहिल्या चार दिवसांतच सुमारे चार कोटी रुपयांची थकबाकी (arrears) वसुल झाली. मात्र दिवाळी आल्याने महापालिकेला ही मोहिम मध्येच थांबवावी लागली. दिवाळीनंतर ही मोहिम पुन्हा सुरू केली गेली. परंतु, मोहिमेसाठी ढोल पथकांना दिलेल्या 19 दिवसांच्या निर्धारित मुदतीच्या उर्वरित 15 दिवसात जेमतेम 6 कोटी रुपये जमा होऊ शकले. सुरूवातीला लाभलेला प्रतिसाद शेवटपर्यंत कायम न राहिल्याने कर वसुली विभागाने (Tax Recovery Department) ही मोहिम स्थगित केली होती.

यादरम्यान महापालिकेने बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्याची कार्यवाही सुरू केली. आता पुन्हा एकदा थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बजाओ मोहिम राबविली जाणार आहे. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी या मोहिमेसाठी करवसुली विभागाला हिरवा कंदील दिला आहे.

जप्ती मोहिमही सुरूच राहणार

एकीकडे घरपट्टी थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बजाओ मोहिम राबविताना दुसरीकडे बड्या थकबाकीदारां विरोधातील जप्ती मोहिमही सुरूच राहणार आहे. बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्याचे आदेश उपायुक्त(कर) अर्चना तांबे यांनी दिले आहेत. जप्ती वॉरंटच्या 21 दिवसांच्या मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधित थकबाकीदारांच्या मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com