Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहापालिकेला पोलीस छावणीचे रूप

महापालिकेला पोलीस छावणीचे रूप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिंदे गटात गेल्याने माजी नगरसेवक प्रविण तिदमे ( Former Coporator Pravin Tidme ) यांची महापालिकेच्या म्युनिसीपल कामगार संघटनेच्या ( Municipal Kamgar Sanghatna )अध्यक्षपदावरुन संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बबन घोलप यांनी हकालपट्टी करून शिवसेना महानगर प्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर ( Former Corporator Sudhakar Badgujar- Shivsena )यांची नेमणूक केली.

- Advertisement -

मात्र, तिदमे यांनी मीच अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे तर आज महापालिकेच्या कार्यालयात बैठक घेण्याचे जाहीर केले होते, दुसरीकडे बडगुजर हे देखील मनपात येणार होते. त्यामुळे शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेऊनमनपा मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाला ( Rajiv Gandhi Bhavan Nashik ) पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

सरकारवाडा पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह सुमारे दोन डझन पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे सुरक्षा रक्षक मुख्य प्रवेशद्वारापासून आंत पर्यंत होते. महापालिकेतील मागील प्रवेशद्वार दुपारनंतर बंद करण्यात आले होते तसेच मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दोन पैकी एकच द्वार सुरू ठेवण्यात आले होते. तसेच महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच आत मध्ये सोडण्यात येत होते. दुसरीकडे ज्या ठिकाणी मीटिंग घेण्याचे जाहीर करण्यात आले होते तो सभागृह महापालिका प्रशासनाने सिल करून दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या