Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याहृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचेही निधन

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचेही निधन

निऱ्हाळे | Nirhale

निऱ्हाळे-फत्तेपुर येथील सांगळे कुटुंबातील मुलाचे नवी मुंबई येथे बुधवारी (दि.31) सकाळी निधन झाल्याची वार्ता समजताच गावी असणाऱ्या आईचेही ह्रदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

येथील भूमिपुत्र व सध्या नवी मुंबई येथे राहणारे शिवराम फकिरबा सांगळे (62) हे मुबंई येथील अधिक्षक शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपासून ते पॅरेलीसिसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी (दि.31) सकाळी 7.30 वाजता निधन झाले.

नातेवाईक त्यांचे शव मुंबईवरुन अंत्यविधीसाठी निऱ्हाळे येथे आणण्यात येत होता. यावेळी गावी भाऊ, भावजया व आई होत्या. नातेवाईकांनी शिवराम यांची वृध्द आई ठकुबाई (96) यांना याबाबत काही समजून दिले नाही.

प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मात्र, घराकडे येणारे नातेवाईक व काहींना रडू न आवरल्याने ही वार्ता ठकुबाई यांना समजली. त्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यांचेदेखील निधन झाले. मुलापाठोपाठ आईनेही जीव सोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

समृद्धी महामार्गावर दिवसभरात दुसरा अपघात; शिर्डीहून घोटीकडे जाताना कारचे टायर फुटले अन्…

जाम नदीवरील स्मशानभूमीत आई व मुलाला एकाच वेळी अग्निडाग देण्यात आला. परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. शिवराम यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजया, नातवंडे, पुतणे, सूना असा मोठा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी शिवराम यांचे लहान बंधू प्रदिप यांचेही ह्रदयविकाराने निधन झाले होते.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला

- Advertisment -

ताज्या बातम्या