Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता मास्कमुक्तीवरून केंद्र राज्य संघर्ष; तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता - डॉ...

आता मास्कमुक्तीवरून केंद्र राज्य संघर्ष; तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता – डॉ भारती पवार

नवी दिल्ली | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) काल (दि ३१) रोजी मास्क ऐच्छिक करण्यात आले असून करोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आजपासून पुढचे सण उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरी करा असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, केंद्राने मास्क वापरावेच लागेल असे म्हटले असून आज देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार (Dr Bharati Pawar, The Minister of Health and Family Welfare for state) यांनी राज्याच्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, राज्य सरकारने कुठले संशोधन करून हा निर्णय घेतला आहे हे माहिती नाही. करोनाचे (Covid 19) संकट अजून दूर झालेले नाही. मास्क वापरावेच लागणार आहे. याबाबतच्या सूचनादेखील केंद्राने राज्यांना दिलेल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने असा निर्णय का आणि कुठल्या अनुषंगाने घेतला आहे हे सांगता येणार नाही.

निर्बंध शिथिल केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या दबावामुळे राज्याने निर्बंध शिथिल केले असे म्हणत श्रेय घेतले. असे असतानाच दुसरीकडे मात्र केंद्राकडून राज्याच्या निर्णयावर ताशेरे ओढण्यात आले असून येणाऱ्या काळात मोठे संकट उभे राहू नये यासाठी मास्क गरजेचे असल्याचे डॉ पवार (Dr Bharati Pawar) यांनी म्हटले आहे.त्यामुळे राज्य आता या निर्णयाचा पुन्हा विचार करणार की नियम जैसे थेच ठेवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या