दिलासादायक! यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

दिलासादायक! यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई । Mumbai

नैऋत्य मोसमी पावसाने (Rain) नुकताच भारतात (India) प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) आज (३१ मे) रोजी जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज (rain forecast) जाहीर केला. त्यानुसार देशात यावर्षी सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे...

हवामान विभागाने (Meteorological Department) यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाचा अंदाज वाढवून तो १०३ टक्के करण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून (Meteorological Department) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (Konkan & Western Maharashtra) पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा (rain) इशारा देण्यात आला असून या ठिकाणी यलो अलर्ट जारी (Yellow alert) केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com