मोटार सायकल रॅॅली द्वारे 'माती वाचवा' चा संदेश

मोटार सायकल रॅॅली द्वारे 'माती वाचवा' चा संदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

माती वाचवा मोहिमेअंतर्गत ( Save Soil ) लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी मुंबई ( Mumbai )शहरात १०८ दुचाकीस्वारांनी पिलियन्स सोबत गर्जना केली. जमिनीचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि ती पूर्वव्रत करण्याच्या तातडीच्या प्रयत्नांसाठी सद्गुरूंनी ( Sadguru )गेल्या महिन्यात ह्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मोहीमेची सुरुवात केली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांचा पाठिंबा सक्रिय करणे आणि मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरांवर धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. सेव्ह सॉईल लोगो, फलक आणि झेंडे आणि एका खास डिझाइन केलेल्या बाइकर्सच्या बिब बरोबर बाइकर्सनी ( Motor Cycle Rally ) मुंबईकरांचे लगेच लक्ष वेधून घेतले.

ही बाइक राइड सदगुरूंच्या आगामी भाषणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केली गेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) च्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP१५) च्या यंदाच्या 15 व्या सत्रात मुख्य भाषणात 195 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राजकीय नेत्यांना सद्गुरू आवाहन करत त्यांच्या देशांमध्ये माती वाचवण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करा अशी विनंती करतील.

'संपूर्ण इतिहासात, मोटारसायकल चालवणाऱ्या समुदायांनी मोठ्या कारणांसाठी रॅली काढल्या आहेत. मुंबईत 'माती वाचवा' हा संदेश देण्यासाठी आम्हीही आमच्या मोटारसायकल घेऊन मोठ्या संख्येने बाहेर पडलो आहोत,' असे मुख्य राइड आयोजक अर्जुन रमण यांनी सांगितले.

विप्रो कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष श्री रामन, जे नियमितपणे अशा कारणांसाठी स्वयंसेवा करत असतात, त्यांनी सकाळी ८च्या दरम्यान गिरगाव चौपाटीच्या प्रतिष्ठित विल्सन महाविद्यालय येथून ह्या राइडला सुरुवात केली ती आकाराच्या दरम्यान वांद्रे फोर्ट गार्डनला संपली. या राइडने लोकांना ‘Earth Buddies (भूमित्र)’ म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले गेले आणि लोकांमध्ये नामशेष होणाऱ्या मातीबद्दल जागरुकता पसरवली.

“सबंध जगभरात मातीच्या ढासळत्या स्थितीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सद्गुरू २४ देशांत दुचाकीवरून एकटे प्रवास करत आहेत. आपली माती आपलेच भविष्य आहे. जेव्हा या कारणाला मदत करण्यासाठी काहीतरी करण्याची संधी बाईक राईडच्या रूपात आली तेव्हा मी ते नाकारण्याचा प्रश्नच उध्दभवलाच नाही. आपल्या प्रजातींच्या सुसंगत अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या या उपक्रमाला समर्थन देणे, ही प्रत्येक जिवंत व्यक्तीची जबाबदारी आहे. मी माझी भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्यांना याबद्दल माहिती असेल त्यांनीही करावे. कारण प्रत्येक आवाज गरजेचा आहे,” असे मुंबईचे ४७ वर्षीय आर्किटेक्ट आदित्य जयस्वाल म्हणाले.

माती वाचवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सद्गुरू सध्या युरोप, मध्य आशिया आणि अरब राष्ट्रांमधून १०० दिवसांचा, ३०,००० किमी एकट्याने मोटरसायकलवर प्रवास करत आहेत. माती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी धोरणात्मक कारवाई करण्याची तातडीची गरज दर्शवण्यासाठी ते जागतिक नेते, शास्त्रज्ञ, पर्यावरण संस्था, माती तज्ञ आणि इतर भागीदारांच्या भेटी घेत आहेत.

संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) चेतावणी दिली आहे की, वाळवंटीकरणामुळे २०४५ पर्यंत अन्न उत्पादनात ४०% घट होऊ शकते, आणि जगाची लोकसंख्या ९ अब्ज पेक्षा जास्त असू शकते. UNCCD च्या म्हणण्यानुसार, जर माती अशीच नामशेष होत राहिली, तर २०५० पर्यंत ९०% ग्रहाचे आजपासून तीन दशकांपेक्षाही कमी कालावधीत.वाळवंटीकरण होऊ शकते -

“जेव्हा मला कळले की जगातील अर्ध्याहून अधिक शेतजमीन निकृष्ट झाली आहे, आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी अन्नटंचाई, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचे नुकसान, अशा अनेक आपत्तींनी युक्त असे जग मागे सोडणार आहोत, तेव्हा मी ताबडतोब 'माती वाचवा' या संदेशाची निकड वाढवण्यासाठी ‘मातीचे योद्धा’ आणि मुंबई-बाईकर्सशी हातमिळवणी केली,” असे ट्रिफेक्टा कॅपिटलच्या भागीदार लावण्य अशोक म्हणाल्या. त्या गिरगाव चौपाटी, प्रियदर्शनी पार्क, शिवाजी पार्क आणि वांद्रे फोर्ट गार्डन चा प्रत्येकी १५-१८ किमी चा प्रवास करणाऱ्या पैकी एक होत्या.

‘माती वाचवा’ अभियानाला जगभरातून व्यापक समर्थन मिळाले आहे. कित्येक राष्ट्रांनी धोरणांची अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता म्हणून ‘माती वाचवा’ सोबत सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. यामध्ये अझरबैजान सारख्या राष्ट्रांनीही अलीकडे पाऊल उचलले. उद्या ९ मे आणि १० मे रोजी सद्गुरू COP १५ मध्ये उपस्थित नेत्यांना संबोधित करतील ज्यामुळे जगभरातील जमिनीचा वेगवान ऱ्हास थांबवण्याच्या आणि जागतिक वाळवंटीकरण उलटवण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या सदस्य राष्ट्रांस COP १५ ठोस कृती करण्यास सक्षम होतील अशी अपेक्षा आहे.

कॉन्शियस प्लॅनेट: माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक मोहीम आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी लोक मोहीम आहे. जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या ६०% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.

Related Stories

No stories found.