
मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात जलद घडामोडी घडताना दिसत आहेत. आज संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते.
या दोन नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडत असल्याने याप्रसंगी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचीही उपस्थिती होती, रात्री उशीरापर्यंत ही बैठक चालली.
दरम्यान, महाविकास आघाडीत समन्वय टिकून राहावा, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत, या विषयावर ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.