Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : महापौरांनी स्मार्ट सिटी कंपनीवर ओढले ताशेरे

Video : महापौरांनी स्मार्ट सिटी कंपनीवर ओढले ताशेरे

नाशिक। प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटीचे Smart City अधिकारी महापालिकेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता परस्पर कामे करत आहेत. त्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे. महापालिका आयुक्त, स्मार्ट सिटी सीईओ आणि नगरसेवक पदाधिकारी यांनी समन्वय साधावा, अशा सूचना महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

महापालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण GBM सभेत नगरसेवक शाहू खैरे Corporator Shahu Khaire यांच्यासह नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कामांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी शाहू खैरे यांनी महापौरांना उद्देशून खोटे वाटत असेल तर रस्त्यावर उतरा आणि स्मार्ट सिटीचे कामे बघा असे सांगितले.

यावर महापौरांनी सायंकाळी अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव महाराज पटांगण, गांधी तलाव, रामकुंड, कपालेश्वर मंदिर परिसर आदी भागात पाहणी केली. यावेळी अर्धवट कामे आणि परस्पर केलेली कामे बघून तीव्र नाराजी व्यक्त करत समन्वय साधण्याचे आदेश उपस्थित स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

स्मार्ट सिटीची पाहणी करताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यापूर्वीचे स्मार्ट सिटी सीईओ यांच्यावर ठपका ठेवत त्यांनी परस्पर केलेल्या या कामांमुळे हा त्रास होत आहे. तसेच आता इथून पुढे फक्त निर्णय होतील चर्चा बैठका यात वेळ जाणार नाही. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी इथून पुढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा असाही आदेश त्यांनी यावेळी दिला.

तिघे प्रथमच एकत्र

शहराचे प्रथम नागरिक महापौर सतीश कुलकर्णी, शहराच्या प्रशासनाची धुरा सांभाळणारे महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि केंद्रीय मंत्रालयाने नेमलेल्या स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे आज पहिल्यांदाच एकत्र येत स्मार्ट नाशिकची पाहणी करत होते, अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.

पाहणीसोबत आयुक्तांना गोदाघाटाची ओळख

दरम्यान, या पाहणीवेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना महापौर सतीश कुलकर्णी वेळोवेळी गोदाघाटावरील वास्तूंची ओळख करून देताना दिसले.

आज महासभेत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला असता पाच वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या स्मार्ट सिटीने संपूर्ण शहर कसे खोदून ठेवले आहे. त्याचा नागरिकांना कसा त्रास होत आहे, याविषयी मत मांडले. महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांना जेव्हा याबाबत विचारणा होते तेव्हा ते स्मार्ट सिटीचे नाव सांगतात; स्मार्ट सिटीचे अधिकारी कोणतेही उत्तर देत नाही. एका वेळी एकच काम पूर्ण न करता सर्व कामे अर्धवट करत असल्याचे संगितले. याबाबत संपूर्ण सभागृहाचे एकमत झाले. यावेळी महापौर, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ यांना गोदाकाठी येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे सांगितले. त्यांनी स्वतः पाहणी करत विषय समजून घेत महापालिका अधिकारी आणि स्मार्ट सिटी अधिकारी यांना समन्वय साधण्याचे आदेश दिले. नाशिकचा विकास होत असताना आपलं नाशिकपन हरवत असेल तर त्याला आम्ही विरोध करणारच.

– शाहू खैरे नगरसेवक, महापालिका Shahu Khaire, Corporator

- Advertisment -

ताज्या बातम्या