Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक ! आईच्या कुशीतून बिबट्याने मुलाला पळवले

धक्कादायक ! आईच्या कुशीतून बिबट्याने मुलाला पळवले

म्हाळसाकोरे। वार्ताहर Mhalsakore

द्राक्षबागेत काम आटोपून घराकडे परतत असताना आईच्या कुशीतून सातवर्षीय बालकाला बिबट्याने अलगद उचलून नेल्याची घटना तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे आज (दि.29) घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

येथील मुरकुटे वस्तीवर सुरगाणा येथून महिनाभरापासून वास्तव्यास असलेले मजूर द्राक्षबागेत काम करीत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास काम आटोपून मजूर घरी परतत असताना मकाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने निर्मला ठाकरे यांच्या कुशीतून सात वर्षीय रोहनला अलगद उचलले. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे मजूरही अवाक् झाले. रोहनचे आई-वडील बेशुद्ध पडले. बिबट्याने रोहनला उचलून मकाच्या शेतात धूम ठोकली.

हे मजूर कडवा कालव्यावरील मुरकुटे यांच्या गट नंबर 25 मध्ये शेतीकाम करीत होते. पोलीस पाटील संपत नागरे यांनी माहिती दिल्यानंतर सायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, हवालदार पवन निकम, टी. एम. झुरडे घटनास्थळी दाखल झाले.

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. दरम्यान शनिवारी (दि. 28) प्रवीण मुरकुटे यांना बिबट्याने दर्शन दिले होते. आठ दिवसांपूर्वी परिसरात पिंजराही लावण्यात आला होता. मात्र आज बिबट्याने बालकाला लक्ष्य केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या