Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकला

सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकला

The flag of glory was hoisted on the Saptshringi fort

नवमीला 40 हजार भाविकांकडून आदिशक्तीचे दर्शन

- Advertisement -

कळवण । प्रतिनिधी Kalwan

नवरात्रीची ( Navratri Festival ) सांगता महानवमीने होते. या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. कमळावर विराजमान माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. महानवमीचा दिवस खूप खास आहे. या दिवशी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्यापूजा करावी. लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. याशिवाय नवमीच्या दिवशी हवन करणेदेखील शुभ मानले जाते.

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या महानवमीनिमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा ग्रामपंचायत सदस्य संदीप शशिकांत बेनके व देणगीदार भाविक अरविंद गणपत कल्पे यांनी सपत्नीक केली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 7 वाजता देवीची महापूजा करण्यात आली. याप्रसंगी डी.एफ.ओ. उमेश वावरे, आमदार सुहास कांदे, आ. दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विश्वस्त बंडू कापसे, अ‍ॅड. ललित निकम, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभागप्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. होमगार्डसोबत पोलीसही कार्यरत आहेत.

सालाबादप्रमाणे अश्विन नवमीस सप्तशृंगगडावर देवीच्या शिखरावर मध्यरात्री ध्वज लावला जातो. या ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार, सदस्य, विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली. या ध्वजासाठी मध्यरात्री 12 वा. शिखरावर जाऊन तेथील पूजाविधी करण्यासाठी 10 फूट लांब काठी, 11 मीटर केशरी कापडाचा ध्वज, पूजेसाठी गहू, तांदूळ, कुंकू, हळद, जाणार्‍या मार्गातील विविध ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य, नैवेद्य आदी घेऊन जावे लागते.

काल दुपारी 12 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते करून कीर्तिध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर हा ध्वज फडकवण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील मार्गस्थ झाले. समुद्रसपाटीपासून 4569 फूट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोनवेळा हा कीर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रोत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकावले जाते. दरेगावचे गवळी पाटील सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू ध्वज फडकावणार्‍याकडे दिल्या जातात.

दुपारी साधारण 4.30 च्या सुमारास गावातून कीर्तिध्वजाची वाजतगाजत मिरवणूक निघाली. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून पाटील देवीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पुढील मार्गासाठी रवाना झाले. शिखरावर पोहोचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज फडकावला. शिखरावर चढण्यासाठी त्यांना 6 ते 7 तासांचा कालवधी लागतो. दरेगावचे गवळी पाटील यांचे पहाटे 4 ते 5 च्यादरम्यान शिखरावरून मंदिरात आगमन होताच भाविक दर्शन घेऊन आज परतीच्या मार्गाला लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या