Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याबगेंच्या साहित्यात निर्मळ जगण्याचा अविष्कार : एलकुंचवार

बगेंच्या साहित्यात निर्मळ जगण्याचा अविष्कार : एलकुंचवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ज्येष्ठ लेखिका आशा बगे ( Senior writer Asha Bage)यांच्या साहित्याला अध्यात्मिक अधिष्ठान असून कुटुंब वत्सलतेमुळे समृद्ध निर्मळ जगण्याचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून प्रकट होतो, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी काढले.

- Advertisement -

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आज प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार (Janasthan Puraskar )ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांंना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगाकर यांंच्या हस्ते व ज्येष्ठ लेखक, नाटककार महेश एलकुंंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी एलकुंचवार बोलत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाकवी कालिदास कलामंंदिरात हा शानदार सोहळा झाला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठान एक वर्षाआड गोदागौरव आणि जनस्थान हे दोन पुरस्कार देते. यावर्षी जनस्थान पुरस्काराचे 17 वे वर्ष होते.

एलकुंचवार पुढे म्हणाले की,आशाताईंच्या साहित्यात निकोपवृत्ती दिसते.त्यांचे साहित्य समजण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन अन् पूर्व भ्यासही असावा लागतो. त्याशिवाय ते समजणे शक्य नाही. हल्ली पुस्तक कसे वाचावे? नाटक कसे पहावे. हे शिकवण्याची गरज भासू लागली आहे. न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले की, सध्या गुणवत्तेवर पुरस्कार मिळतो यावर विश्वास राहिला नाही.एवढी परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा काळात केवळ गुणवत्तेवर जनस्थान पुरस्कार बगे यांना प्रदान करताना आनंंद होत आहे. सध्या मराठी लघुकथेची दयनीय अवस्था झाली आहे.अशा काळात श्रीमती बगे यांनी सर्वशक्तीनिशी मराठी लघुकथांना समृध्दी मिळवून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना बगे म्हणाल्या की, आनंदाचा शोध हा वाड्:मयाचा प्राणस्वर असतो. तो सृष्टीचाच अंंश असतो.

एलकुंचवार यांना जुन्या नाशिकची भुरळ

एक तपानंतर महेश एलकुंंचवार नाशिकला आले होते. त्यांनी नवे व जुने नाशिक जवळून पाहिले. आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी जुन्या नाशिकच्या वैभवापासून केली. ते म्हणाले नाशिकबद्दल मला प्रचंड जिव्हाळा आहे. येथील गोदावरी नदी, कुसुमाग्रज यांच्याशी नाते होतेच. जुने नाशिकही जवळून पाहता आले. येथील जुने वाडे, काळाराम, गोरेराम मंदिराचे नक्षीदार भव्य काम, खळाळून वाहणारी गोदावरी,आल्हददायी वातावरण पाहून खूप आनंद झाला. खर्‍या नाशिकचा आज परिचय झाला. खूप समाधान वाटले. यापुढे नेहमी येत राहावे असे वाटू लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या