इच्छुकांचे मनसुबे उधळले

राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार लढत?
इच्छुकांचे मनसुबे उधळले

नवीन नाशिक । Navin Nashik - निशिकांत पाटील

राज्य सरकारने (State Government) गेल्या काही दिवसांपूर्वीच तीन जणांचा प्रभाग होणार असे जाहीर केले. यामध्ये नवीन नाशिक (Navin Nashik) परिसरात प्रस्थापितांना हायसे वाटले, मात्र आतापर्यंत इच्छुक उमेदवार व स्वतःला भावी नगरसेवक (Future corporator) म्हणून घेणार्‍यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे.

आगामी महापालिका निवडणुका (Upcoming municipal elections) कधी होणार याबाबत तर्क-वितर्क आत्तापर्यंत लढवले जात होते, मात्र ठरलेल्या वेळातच मनपा निवडणुका होतील, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. असे असताना प्रभाग पद्धती की वॉर्ड पद्धती होते याची उत्सुकता आता संपलेली असून तीन जणांचा प्रभाग होणार आहे. यामुळे नवीन नाशिक परिसरामध्ये असलेल्या सहा प्रभागांतील परिसराची रचना कशा पद्धतीने होईल याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

वार्ड पद्धती झाली असती तर कदाचित नव्यांना संधी मिळण्यासाठी मात्र सध्या प्रभाग रचना बघता आगामी चित्र काय असेल किंवा महापौर (Mayor) कोणाचा बसेल, याकरिता कुठला पक्ष कशापद्धतीने जोर लावतो याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. सध्या नवीन नाशिक परिसरामध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) 14 नगरसेवक त्यापैकी नगरसेविका कल्पना पांडे (Corporator Kalpana Pandey) यांचे करोनाकाळात लोकांची सेवा करत असतांना बाधित होऊन निधन झाले.

अद्यापही त्यांची जागा रिक्त आहे. त्यांच्या जागी त्यांची कन्या शिवानी हिला उमेदवारी दिली जाणार असल्याची वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे.तर भाजपचे (BJP) - 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Rashtravadi Congess Party) एक नगरसेवक असे बलाबल आहे. तर गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेस पक्षाला (Congress) जनतेने नाकारले होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन नाशकात भाजपच्या पश्चिम विधानसभेच्या विद्यमान आमदार सीमा हिरे (MLA border diamonds) यांचे संपर्क कार्यालय असून शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख पद हे नवीन नाशकातीलच विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर (Corporator Sudhakar Badgujar) यांना मिळाले.

तर आमदारकीच्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अपूर्व हिरे व ज्येष्ठ नेते नाना महाले यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली असून आपला प्रतिनिधी कसा निवडून आणता येईल व योग्य उमेदवार म्हणून कोणाला तिकीट द्यावे याकरिता इच्छुकांच्या मुलाखती देखील पार पडल्या. दुसरीकडे मनसेना नेते तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कार्यालयात जाऊन आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले संघटन बळ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

सध्या मनपावर भाजपची सत्ता असली तरी आगामी महापौर हा शिवसेनेचाच होणार असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वारंवार स्पष्ट केले.त्यादृष्टिकोनातून शिवसेनेची लाट आणण्याचे काम नवीन नाशिकच नव्हे तर संपूर्ण नाशकात सुरू आहे. यासोबतच आगामी निवडणुकीत नगरसेवक म्हणून आपण मनपा दालनात जाऊ, या करिता विविध पक्षांना सोबत घेत तसेच सध्या कुठल्या पक्षात प्रवेश न घेता समाजकार्य सुरू ठेवून नगरसेवक पदाचे स्वप्न बाळगणार्‍यांना तीन उमेदवारांच्या प्रभाग पद्धतीने चांगलाच धक्का बसल्याची चर्चा नवीन नाशकात सुरु आहे.

जिथे अवघ्या काही हजार मतदानात आपण निवडून येऊ अशी विचारसरणी ठेवून बरीच मंडळी समाजसेवेच्या माध्यमातून रिंगणात उतरली होती. त्यांना आता सुमारे 30 ते 36 हजार लोकसंख्येच्या मतदार संघात निवडून येण्याकरिता कुठल्या प्रकारे समीकरण जुळवावे याची सर्वत्र चर्चा करताना इच्छुक उमेदवार दिसून येत आहेत.

नवीन नाशिककर आता पुन्हा एकदा लाटेच्या मागे धावणार की अन्य वेगळ्या पद्धतीने मतपेटीमध्ये आपला कौल देणार ही तर येणारी वेळ ठरवेल. मात्र हे सर्व करत असताना नवीन नाशकात सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेली विविध समाजकार्य बंद पडणार नाहीत म्हणजे नवीन नाशिककरांचे फावले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Related Stories

No stories found.