संत वाड्.मयाचा प्रभाव आजही कायम

संत वाड्.मयाचा प्रभाव आजही कायम

परमपूज्य वै. बस्तीरामजी सारडा पुण्यतिथी ऑनलाईन व्याख्यानात चैतन्यमहाराजांचे प्रतिपादन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

संंत वाड्.मयाचा saint literature जनमानसावरील प्रभाव सातशे वर्षांपासून कायम आहे. तो कधी ओसरला नाही व भविष्यातही ओसरणार नाही. संंत वाड्.मयाच्या आधाराशिवाय कोणालाही पुढे जाता येत नाही. दुःखदसमयी जीवनाला दिलासा देण्याचे काम आजही संत वाड्.मयच करते. संत वाड्.मयाचा प्रभाव ओसरत नसून तो कायम आहे, असे विचार संंत वाड्.मयाचे गाढे अभ्यासक ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर Chaitanya Maharaj Degalurkar यांंनी व्यक्त केले.

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त 59th death anniversary of Late.Bastiramji Sarda चैतन्यमहाराज यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. ‘संत वाड्.मयाचा प्रभाव ओसरत आहे का?’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. प्रारंभी ‘देशदूत वृत्तसमुहा’चे व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा यांनी प्रास्ताविक आणि चैतन्यमहाराज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बस्तीरामजी सारडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून चैतन्यमहाराजांनी व्याख्यानास सुरूवात केली.

संत वाड्.मयाचा प्रभाव ओसरला नसून तो वाढत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे विचार सातशे वर्षे टिकले हेच जगातील दुर्मिळ उदाहरण आहे. संतांनी नेहमीच कर्मातूनच देवाची पूजा करायला शिकवले. संत साहित्याची उपयुक्तता माणसाला आयुष्यभर असते. गेल्या दोन वषार्र्त करोना संकटकाळात त्ंयाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. संत वाड्.मयाचे प्रबोधन आजच्या काळातही सर्व घटकांना उपयुक्तच आहे. माणसात माणुसकी निर्माण करण्याचे काम संत साहित्य करते, असे चैतन्यमहाराज म्हणाले.समाजात चांगली कर्मे आजही घडत आहेत.

पूर्वी झालेल्या वाड्.मय निर्मितीचा त्यामागे मोठा प्रभाव आहे. माझ्यात ज्ञानोबा-तुकोबांचा अंश आहे, असे कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात. आजच्या कवींच्या हातून चांगल्या काव्यरचना घडत असतील तर त्यामागेसुद्धा कुठेतरी संत वाड्.मयाचा प्रभाव आहेच. तसे असेल तर संत वाड्.मयाचा प्रभाव ओसरत आहे, असे कसे म्हणावे? रोज नवीन चांगल्या गोष्टी जन्माला येतात, त्या अर्थी संत वाड्.मयाचा प्रभाव आजही ओसलेला नाही. संत वाड्.मय ही मानवाला मिळलेली अनमोल देणगी आहे.

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा प्रत्येकाने वाचली पाहिजे. भौातिक गोष्टींंबद्दल उदासीनता व भगवंताविषयी प्रेमनिर्मिती म्हणजे संत वाड्.मय! परमार्थासाठी बाहेर पडलेेल्या प्रत्येकाने सर्वप्रथम संंतचरित्र वाचले पाहिजे. संत वाड्.मय कोणत्याही परिस्थितीत आत्मानंदात राहायला शिकवते. काळानुरुप परिवर्तन होतच असते. काही परिवर्तने अपरिहार्य असतात. ते आज आपण अनुभवत आहोत. समाजाला काय हवे हे पाहून समाजुरीण ते अमलात अणतात. त्यामुळे काही गोष्टी कालबाह्य होतात. काही अतिपरिचयामुळे व नित्य सानिध्यात रााहिल्यानेे त्यांचे महत्व कमी होते.

काळाच्या ओघात सामाजिक परिवर्तन घडते. त्यामुळे संंत साहित्याचे महत्वही काळानुसार सिद्ध करता आले पाहिजे. आज ज्ञानेश्वरी वाचली जाते. पारायणे होतात. पसायदान, हरीपाठ म्हटला जातो. आजारपणाच्या दु:खद काळात संतसाहित्य जीवनाला उभारी देताना दिसले. संत साहित्याच्या प्रभावातूनच हे घडू शकले, असे सांगून चैतन्यमहाराजांनी मानवी जीवनातील संत साहित्याचे महत्त्व विषद केले.

आजकाल इतर वाड्.मयांच्या प्रभावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. तशी संंत वाड्.मयाची होत नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र याचा अर्थ संत वाड्.मयांचे महत्व कमी झाले असा होत नाही. काळ कितीही बदलला, जग कि तीही बदलले तरी संकटांची मालिका माणसाची पाठ सोडत नाही तोपर्यंंत संत वाड्.मयाचे मानवी जीवनातील महत्व तसूभरही कमी होणार नाही. संत वाड्.मयाकडे केवळ उपासना म्हणून न पाहता त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न झाल्याने सध्या संत. वाड्.मयाचा प्रभाव ओसरत असल्याचा भास होत आहे.

अंंध उपासना मर्यादेपलीकडे समाधान देऊ शकत नाही. म्हणून उपासनेला अभ्यासाची जोड देणे गरजेचे आहे, असे चैतन्यमहाराजांनी आवर्जून सांगितले. देशदूत वृत्तसमुहाचे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी आभार प्रदर्शन केले. पुढचा पुण्यातिथी सोहळा याच वर्षी 24, 25, 26 डिसेंबरला होईल, असे त्यांनी जाहीर केले.

संत वाड्.मय दीपस्तंभ

संत वाड्.मयाचे मानवी जीवनातील महत्त्व चैतन्यमहाराजांनी पटवून दिले. समुद्रातील दीपस्तंभ नावाड्यांना, नाविकांना दिशा दाखवण्याचे काम करतो. संत वाड्.मय हा मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभच आहे. आमच्या जीवननौकेला तो भरकटू देत नाही. संत वाड्.मयाचा प्रभाव असण्याची कारणे अगणित आहेत. काळ बदलला असला आणि जीवनशैलीत बदल झाला आहे, पण माणसांपुढील प्रश्न तेच आहेत, असे ते म्हणाले.

भीतीच्या निवृतीसाठी आधार

सामान्य माणसाच्या जीवनातील भीतीच्या निवृतीसाठी संत वाड्.मयाशिवाय दुसरा आधार दिसत नाही. संत वाड्.मय गरजेवरचे औषध नाही. त्या गरजेकडे बघणार्‍या दृष्टीवरचे औषध आहे. भयग्रस्त वातावरणात संत वाड्.मयाने आमच्या मनाला दिलासा दिला. त्यामुळे मनाला स्थैर्य प्राप्त झाले असेल तर संत वाड्.मयाचा प्रभाव कमी होतोय, असे का म्हणायचे? असा सवाल चैतन्यमहाराजांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com