Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याजानेवारी अखेरीस रुग्ण संख्येचा उच्चांक

जानेवारी अखेरीस रुग्ण संख्येचा उच्चांक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

  • गृह विलगिकरणाचा कालावधी सात दिवसांचा

    - Advertisement -
  • रुग्णांना घरीच मिळणार ‘उपचार’ किट

राज्यात करोनाची तिसरी लाट (third wave of Corona) सुरू झाल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जानेवारी अखेरपर्यंत ही लाट उच्चांक गाठेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Public Health Minister Rajesh Tope) यांनी सोमवारी दिली.

त्यानंतर फेब्रुवारीत रुग्ण संख्या कमी होणार असल्याची शक्यताही टोपे यांनी वर्तवली.असे असले तरी 85 टक्के रुग्णांमध्ये करोनाची (corona) कोणतीही लक्षणे नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण गृह विलगिकरणात (home segregation) असून त्यांच्यासाठी देशभरात विलगिकरणाचा कालावधी हा सात दिवसांचा राहणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी आज पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील (Union Territories) करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राजेश टोपे हे उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली. राज्यात आजच्या घडीला सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार इतकी आहे. 85 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. 1 हजार 711 एवढे रूग्ण आयसीयूमध्ये आहेत.

ऑक्सिजन (Oxygen) लागणार्यांचे प्रमाण 2 टक्के आहे. त्यामुळे दोन अधिक एक असे तीन टक्के जर ऑक्सिजन (Oxygen) आणि आयसीयूचे सोडले तर 13 टक्के लोक हे जवळजवळ सौम्य आणि मध्यम स्थितीमधले आहेत, असे टोपे म्हणाले. राज्यात 38 हजार 850 आयसीयू बेड्स (ICU beds) आहेत. या पैकी 1 हजार 710 बेड्सवर रूग्ण उपचार घेत आहेत.

व्हेंटिलेर्स बेड (Ventilator bed) 16 हजार आहेत, त्यापैकी 700 बेड्सवर रूग्ण आहेत. ऑक्सिजन बेड्स देखील 1 लाख 34 हजार आहेत. त्यापैकी 5 हजार 400 रूग्ण ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या या सुविधांवर कोणताही ताण पडलेला नाही ही बाब केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे राजेश टोपे म्हणाले.

ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंगवर भर

चाचण्या वाढवा. ट्रॅकींग, ट्रेसिंग (Tracking, tracing) आणि टेस्टिंग यावरच भर द्या. कोविडच्या (covid-19) नियमांचे पालन आवश्यक आहे. लसीकरणावर (vaccination) भर द्या, अशा सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

क्वॉरंटाइन रुग्णांना तीन वेळा कॉल

राज्यात आरोग्य विभागाचा (Department of Health) डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. या कॉल सेंटरवरून रुग्णाला विलगिकरणच्या कालावधीत कॉल करून प्रकृतीची विचारणा केली जाईल. पहिल्या, पाचव्या आणि सातव्या दिवशी या रुग्णांना कॉल केले जातील. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावे यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांना घरपोच उपचार किट

कोरोना (corona) रुग्णांना घरपोच उपचारांचे कीट पोहोचवले जाणार आहे. त्यात 20 मिली सॅनिटायझर (Sanitizer), 10 मास्क (mask), माहिती पुस्तिका, 10 पॅरिसिटामॉल गोळ्या, 20 मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे हे किट जिल्हाधिकार्यांमार्फत रुग्णांपर्यंत पोहोचेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात 33,470 बाधित राज्यात आज तब्बल 33 हजार 470 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर 31 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1247 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या