Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याधुव्वाधार पाऊस सुरूच

धुव्वाधार पाऊस सुरूच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या धुव्वाधार बॅटिंगमुळे जिल्हा टॅकरमुक्त झाला आहे.पेठ, इगतपुरीत ( Igatpuri )पुनश्च हवामान खात्याने अतिवृष्टीचा ( prediction of Heavy Rain Fall )इशारा दिला आहे. चार धऱणे शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर, दारणा, नांदुरमध्यमेश्वर धरणातून अजुनही पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने गोदावरी, दारणा नदीचा पूर अद्याप कायम आहे. काल सायंकाळपर्यंत दारणातून 8846, कडवातून 2592, गंगापूर मधून 8880, आळंदी धरणातून 243 क्युसेसइतका विसर्ग सुरु होता. होळकर पुलाखालून 7512 क्युसेसने पाणी वाहत होते.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. काल नाशिकमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर पावसाची आज सकाळपासून पुन्हा रिपरिप सुरु झाली आहे. त्यातच हवामान खात्याने इगतपुरी, पेठ, ओझरखेड परीसरात रात्रीतून 105 ते 204 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवलीे. गेल्या तीन वर्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यातच 57 टक्कयांंपर्यंत पाऊस प्रथमच झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत सुरु असलेली गा्रमीण भागातील पाणीटंचाई दूर झाली असून जिल्हा टँकर मुक्त झाला आहे.

जिल्ह्यात 236 गाव, वाड्यांसाठी 84 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. एक ते दीड लाख लोकसंख्येची तहान टँकर भागवीत होते. वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे जिल्हा अवघ्या चार दिवसात टँकरमुक्त होण्याचे भाग्य लाभले आहे. जिल्हाप्रशासनाने एकूण परिस्थितीचा आढावा घेत टँकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धरणे भरण्याच्या मार्गावर

जिल्ह्यातील धरणे आता भरत आली आहेत. त्यात ओझरखेड, वाघाड, हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहे. केळझर धरण 93 टक्के भरले आहे. दारणा 65, मुकणे 62, वाकी 23, भाम 54, भावली 79, वालदेवी 72, गंगापूर 63, काश्यपी 53, गौतमी 63, कडवा 69, भोजापूर 49, पालखेड 49, तिसगाव 89, पुणेगाव 68, चणकापूर 52 टक्के भरले आहे.

पावसाचा जोर वाढणार

कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात 80 जणांचा बळी

राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी नागपुरात पुरात गाडी वाहून गेल्याने 6 जणांना जलसमाधी मिळाली तर पुणे जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेला आहे. खान्देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या